शिवरायांच्या विचाराची आजच्या युगाला गरज- प्रा. नितीन बानगुडे-पाटील - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, July 23, 2026

शिवरायांच्या विचाराची आजच्या युगाला गरज- प्रा. नितीन बानगुडे-पाटील

 शिवरायांच्या विचाराची आजच्या युगाला गरज- प्रा. नितीन बानगुडे-पाटील




अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- छत्रपती शिवाजी महाराज यांनी मानवी मूल्यांची आणि चारित्र्याची उत्तम जपणूक केली. त्यांचे वैयक्तिक आयुष्य निष्कलंक होते. शिवरायांच्या स्वराज्यात स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्यास थेट फाशी किंवा गडावरून फेकून देण्याची कठोर शिक्षा होती, हा धाक म्हणजे महाराजांच्या स्त्री सुरक्षेवरील कटिबद्धतेचे प्रतीक आहे, जगाच्या पाठीवर अनेक राजे होऊन गेले, मात्र छत्रपती शिवरायांसारखा चारित्र्य संपन्न पराक्रमी राजे झाले नाहीत, शिवरायांच्या विचाराची आजच्या युगाला गरज असल्याचे प्रतिपादन ख्यातनाम व्याख्याते प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांनी केले.

ते श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाच्या ३९ वा वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा महोत्सवनिमित्त  न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली होत असून, मंगळवारी ख्यातनाम व्याख्याते प्रा.नितीन बानुगडे-पाटील यांचे ‘छत्रपती शिवाजी महाराज’ या विषयावर व्याख्यानाने तिसरे पुष्प संपन्न झाले.

दरम्यान कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन विश्वस्त व माजी उपमहापौर सो.म.पा. दिलीपभाऊ कोल्हे, जि.प. सदस्य प्रवीण तानवडे, तालुका अध्यक्ष,राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, दिलीपभाऊ सिद्धे, नगरसेवक यशवंततात्या धोंगडे, अध्यक्ष भाजपा पूर्व मंडल व मा.सरपंच प्रदीप पाटील, नगरसेवक अविनाश मडीखांबे, तालुका अध्यक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले गट), नगरसेवक तम्मा मामा शेळके,  मा.सदस्य,पंचायत समिती बाळासाहेब मोरे, पंचायत समिती सदस्य गणेश मोरे, अमोल हिप्परगी, अध्यक्ष भाजपा उत्तर मंडल, डॉ. मनोहर मोरे, खजिनदार संजयजी उर्फ लाला राठोड, जिल्हाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक विभाग, फैजअहमद उर्फ नन्नु कोरबू, बाळासाहेब दाभेकर यांचे निकटवर्तीय सहकारी, शिरीष मावळे काका, मयूर कडू, उमेश गालिंदे, भाऊ भिताडे, निलेश वावरे, बाबासाहेब निंबाळकर सर, मोतीराम राठोड,मा.तालुकाअध्यक्ष, भाजपा, सामाजिक कार्यकर्ते शिवराज स्वामी, सरपंच दहिटणे ग्रामपंचायत- नितीन मोरे, सोलापूर बी.वाय. टेलरचे किरण येज्जा, श्रीकांत शिंदे, शरद कागदे, युवराज मुचलंबे, विशाल भांगे यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान श्रींची प्रतिमा, नटराज  व स्वर्गीय लतादीदी मंगेशकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी डेव्हीन ग्रुप मुंबई यांनी नृत्यातून शिवरायांचे गाणे सदर केले.

पुढे बोलताना म्हणाले महाराष्ट्राच्या मातीतून उभे राहिलेले स्वराज्याचे स्वप्न पाहणारे आणि ते साकार करणारे एक महान व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्याच कार्याचा, त्यांच्या विचाराचा आणि शौर्याचा गौरव आज ही होतोय, पुढे ही होत राहणार...! छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक राजा नव्हते तर ते एक महान व्यक्तिमत्व होते त्यांचे विचार आणि कार्य आपल्याला कायमच प्रेरणा देत राहील, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचे संकल्पित कार्य स्वराज्याच्या हितार्थ केले, आजच्या पिढीने शिवरायांचे विचार अंगीकारणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन ख्यातनाम व्याख्याते प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांनी केले.

याप्रसंगी प्रसिद्ध व्याख्याते प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांच्यासह मान्यवरांचा न्यासाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची मूर्ती व छत्रपती शिवाजी महाराजांची रेखीव, सुबक प्रतिमा व कृपावस्त्र देऊन सत्कार करण्यात आला. न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, संजय कुलकर्णी, सोमकांत कुलकर्णी व विश्वंभर पुजारी यांच्या हस्ते मंत्र पठणाने पूजन संपन्न झाले. या बरोबरच सिद्धाराम माळी व अप्पू कलशेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्य या कार्यक्रमप्रसंगी सत्कार करण्यात आला.

यावेळी न्यासाचे विश्वस्त अलकाताई जनमेजयराजे भोसले, अर्पिताराजे अमोलराजे भोसले, माजी नगराध्यक्षा अनिता खोबरे, स्वाती निकम, कु. तेजस्विनीराजे अमोलराजे भोसले, कु. स्वामिनीराजे अमोलराजे भोसले, स्मिता कदम, पल्लवी कदम, उज्वला भोसले, संगीता भोसले, रूपा पवार, स्वप्ना माने, कविता वाकडे, सुवर्णा घाडगे, राजश्री माने, क्रांती वाकडे, अनिता गडदे, धनश्री पाटील, दिव्या मोरे, कल्पना मोरे, अक्षता मोरे, कोमल क्षीरसागर, शितल क्षीरसागर, अक्षता खोबरे, रुपाली भोसले, व न्यासाचे उपाध्यक्ष- अभय खोबरे, सचिव- शामराव मोरे, कु. हर्षवर्धनराजे अमोलराजे भोसले, विश्वस्त- लक्ष्मण पाटील, भाऊ कापसे, लाला राठोड, संतोष भोसले, राजेंद्र लिंबीतोटे, मनोज निकम, बाळासाहेब कुलकर्णी बबलादकर, मैनुद्दीन कोरबू, अश्पाक काझी, ओंकारेश्वर उटगे, प्रभाकर मजगे, शिवशरण खुबा, प्रमोद पोतदार, अँड.संतोष खोबरे, रोहित खोबरे, अरविंद शिंदे, अप्पा हंचाटे, सौरभ मोरे, निखील पाटील, विशाल कलबुर्गी, विलास राठोड, रोहन शिर्के, अतिश पवार, प्रवीण घाटगे, गोटू माने, बाळासाहेब घाटगे, बाळासाहेब पोळ, आकाश गडकरी, कुमार सलबत्ते, सुलतानपूर सरपंच मल्लिकार्जुन स्वामी, किणीवाडी सरपंच शिवयोगी तंबोळे,  शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, सुभाष गडसिंग, मोहनराव शिंदे, संजय फुटाणे, बाबा स्वामी, दयानंद काजळे, शकील नाईकवाडी, किरण जाधव, दत्ता माने, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, श्रीनिवास गवंडी, लक्ष्मण बिराजदार, महांतेश स्वामी, संजय गोंडाळ, प्रसाद मोरे, शंभूलिंग अकतनाळ, शिवा याळवार, दयानंद दणुरे, अरविंद पाटील, सत्तार शेख, योगेश पवार, प्रदीप सुरवसे, वैभव मोरे, फहीम पिरजादे, बालाजी कटारे, पिट्टू साठे, धनप्पा उमदी, सागर शिंदे, केदार तोडकर, नुराद्दिन खासबागदार, प्रीतेश किलजे, राजाराम पवार, आनंदखजुर्गीकर, प्रकाश गडगडे, आकाश सूर्यवंशी, विनायक भोसले, भरत राजेगावकर, मल्लिकार्जुन बिराजदार, प्रा. शरणप्पा आचलेर, गोविंदराव शिंदे, लक्ष्मण शिंदे, अभिषेक चव्हाण, निखील शिंदे, अमित कोळी, ज्ञानेश्वर भोसले, समर्थ चव्हाण, असद फुलारी, संतोष माने, रमेश हळसंगी, सुमित कल्याणी, राहुल इंडे, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, विठ्ठलराव रेड्डी यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण, श्रोते बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी अविनाश मडीखांबे यांच्या वाढदिवसानिमित्त न्यासाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन श्वेता हुल्ले यांनी केले तर न्यासाचे सचिव शामराव मोरे यांनी रसिकप्रेक्षकांचे स्वागत व आभार मानले.  उत्कृष्ठ लाईट व्यवस्था शंभूराजे इलेक्ट्रिकल व मंडप सजावट कल्लप्पा छकडे यांनी केले.


चौकट:
सार्थ अभिमान:-
श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाच्या ३९ वा वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा महोत्सवनिमित्त  न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाने गेल्या २७ वर्षापासून धर्मसंकीर्तन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. ही बाब प्रबोधनकारी असून, सामाजिक कार्याने देखील  गरुड भरारी घेतली आहे. आशा कार्याचा सार्थ अभिमान आहे.
व्याख्याते प्रा.नितीन बानुगडे-पाटील

चौकट :
गुणीजन गौरव  : त्यामध्ये विशेष गौरव पुरस्कार एम.बी.पाटील सर यांना देऊन सन्मान करण्यात आला व गुणीजन गौरव पुरस्काराने अभिमन्यू ताड, सत्यभामा पवार (निंबाळकर), राजू म्हेत्रे, राहूल इंगळे, होमगार्ड यांचा न्यासाच्या वतीने गुणीजन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

चौकट :
गुणवंत विद्यार्थी गौरव  :
तालुक्यातील इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेत व पदवी परीक्षेत उत्तम गुण मिळवलेल्या ६ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव न्यासाच्या वतीने करण्यात आला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages