मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळ्यात भव्य रक्तदान शिबिर
करमाळा (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त "सेवा संकल्प" उपक्रमाअंतर्गत भारतीय जनता पार्टी करमाळा शहर मंडळाच्या वतीने गायकवाड चौक येथील भाजपा संपर्क कार्यालयात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. करमाळा शहर व तालुक्यातील नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत ५५६ रक्तपिशव्यांचे संकलन करण्याचा संकल्प पूर्ण करण्याबरोबरच त्याहीपेक्षा अधिक रक्तदान करून विक्रमी रक्तसंकलन घडवून आणले.
रक्तदान शिबिराचे उद्घाटन भाजपा पश्चिम महाराष्ट्राचे सहसंयोजक विक्रम देशमुख यांच्या हस्ते झाले. प्रारंभी भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून राष्ट्रसेवा व समाजसेवेचा संकल्प करण्यात आला. तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी विक्रम देशमुख यांनी गणेश चिवटे यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत, त्यांनी अनेक वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचे निष्ठेने काम करत विविध उपक्रम यशस्वीपणे राबविले असून समाजकारणातील त्यांचे योगदानही उल्लेखनीय असल्याचे सांगितले. रक्तदान शिबिराला लाभलेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा त्यांच्या जनसंपर्काचा व समाजसेवेचा गौरव असल्याचे त्यांनी नमूद केले.
गणेश चिवटे यांनी सांगितले की, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. यंदाही पावसाचे वातावरण असूनही नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. ५५६ रक्तपिशव्यांचे संकलन करण्याचा संकल्प पूर्ण होऊन अपेक्षेपेक्षाही अधिक रक्तसंकलन झाले. या यशाचे श्रेय प्रत्येक रक्तदाता, कार्यकर्ता आणि समाजहिताची जाणीव ठेवून सहभागी झालेल्या नागरिकांना असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अफसर जाधव, तालुकाध्यक्ष काकासाहेब सरडे, नगरसेवक रामभाऊ ढाणे, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, भगवानगिरी गोसावी, संजय घोरपडे, नितीन झिंजाडे, आजिनाथ सुरवसे, अमोल पवार, अशोक ढेरे, दिनेश मडके, राजश्री खाडे, संगीता नष्टे, हनुमंत रणदिवे, सोमनाथ घाडगे, हर्षद गाडे, अजित शिंदे, आण्णा पडवळे, दादासाहेब देवकर, मच्छिंद्र हाके, बंडू शिंदे, भैय्यासाहेब गोसावी, दादासाहेब येडे, जयंत काळे पाटील, तुषार जाधव, ईश्वर मोरे, दत्ता एकाड, कुणाल दुरंदे, दादा गाडे, गोकुळ अनारसे, दादासाहेब सरडे, हर्षल शिंगाडे, तात्यासाहेब शिंदे, संदीप काळे, सागर सरडे, रंजीत पवार, नानासाहेब अनारसे, जयसिंग भोगे, जयसिंग घाडगे, सुनील नेटके, संजय ढेरे, दीपक गायकवाड, अशोक मोरे, संजय दुर्गुळे, आण्णा साळुंखे, लक्ष्मण शेंडगे, ऋषिकेश फंड, गिरीश वाशिंबेकर, विश्वनाथ ढेरे, समाधान कांबळे, प्रकाश ननवरे, सुनील जाधव, रणजीत वीर, आबा वीर यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि करमाळा शहर व तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:
Post a Comment