मुख्यमंत्र्यांचे माढा मतदारसंघात आगमन; आ अभिजीत पाटील यांनी केले स्वागत
माढा (कटूसत्य वृत्त):- आषाढी वारीनिमित्त माढा मतदारसंघातील टप्पा (चिंचणी) येथे गुरुवारी संत ज्ञानेश्वर माऊली महाराज आणि संत सोपानकाका महाराज यांच्या ऐतिहासिक 'बंधूभेटी' सोहळ्याला उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री जयकुमार गोरे, माढा मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी पालख्यांचे स्वागत करून संतांचे दर्शन घेतले.
यंदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारकऱ्यांसोबत काही अंतर पायी चालत वारीचा अनुभव घेतला. वारकऱ्यांशी संवाद साधत त्यांनी वारीतील भक्ती, समता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश अधोरेखित केला. 'बंधूभेट' सोहळ्यामुळे परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता.
दरम्यान, आमदार अभिजीत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी शुभेच्छांचा स्वीकार करून उपस्थितांशी संवाद साधला.
या प्रसंगी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यासह विविध मान्यवर, लोकप्रतिनिधी, प्रशासनातील अधिकारी, वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी तसेच मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. टप्पा (चिंचणी) परिसरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
.png)
No comments:
Post a Comment