बार असोसिएशन निवडणुकीत अध्यक्षपदासाठी चौरंगी लढत
खजिनदार पदासाठी पंचरंगी; चार ऑगस्ट रोजी मतदान
सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- सोलापूर बार असोसिएशनच्या सन २०२६-२७ च्या वार्षिक निवडणुकीची रंगत आता शिगेला पोहोचली असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी एकाही उमेदवाराने माघार न घेतल्याने सर्व प्रमुख पदांसाठी अटीतटीच्या लढती निश्चित झाल्या आहेत. त्यामुळे १ हजार ६८८ मतदार असलेल्या या निवडणुकीत थेट मतदानातूनच विजेत्याचा फैसला होणार आहे. मंगळवारी उमेदवारी अर्जांची छाननी पूर्ण झाल्यानंतर बुधवारी माघारीच्या दिवशी काही उमेदवार माघार घेतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, कोणत्याही उमेदवाराने नामनिर्देशन अर्ज मागे न घेतल्याने सर्वच पदांसाठीच्या निवडणुका चुरशीच्या होणार आहेत.
अध्यक्षपदासाठी अॅड. संतोष पाटील, अॅड. एस. आर. रेशमे, अॅड. राजेंद्र फताटे आणि अॅड. मल्लिनाथ म्हमाणे यांच्यात अॅड. पदासाठी चौरंगी लढत होणार आहे. खुल्या गटातील उपाध्यक्षपदासाठी अँड. परमानंद जवळकोटे आणि परवेज ढालायत यांच्यात थेट सामना रंगणार आहे.
महिला राखीव उपाध्यक्षपदासाठी अॅड. शर्मिला देशमुख आणि ऊर्मिला जहागीरदार या आमने-सामने आहेत.
सचिव अॅड. जयप्रकाश भंडारे आणि अॅड. मंजुनाथ कक्कळमेली यांच्यात लढत होणार असून, खजिनदार पदासाठी सर्वाधिक पाच उमेदवार रिंगणात उतरल्याने येथे पंचरंगी सामना रंगणार आहे. या
पदासाठी अॅड. सिध्दाराम पाटील, अॅड. संतोषकुमार बाराचारे, अॅड. अंजली बाबरे, अॅड. नरेंद्रकुमार गावडे आणि अॅड. मंगेश कंदलगावकर हे उमेदवार नशीब आजमावत आहेत.
सहसचिव पदासाठी अॅड. प्रियंका गोरंटी, अॅड. मेघना मलपद्दी आणि अॅड. आर. एल. लगशेट्टी
(गोटीपामुल ) यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.
संपताच माघारीची मुदत न्यायालय परिसरात निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे. विविध पॅनल आणि अपक्ष उमेदवारांकडून मतदारांच्या व्यक्तिगत गाठीभेटी, प्रचार पत्रकांचे वितरण आणि संपर्क मोहिमांवर भर दिला जात आहे. निवडणुकीसाठी ४ ऑगस्ट रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार असून, त्यानंतर सायंकाळी ६ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल. ५
ऑगस्ट रोजी विजयी उमेदवारांची अधिकृत घोषणा करून नव्या कार्यकारिणीचा पदभार सोहळा पार पडणार आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि सुरळीत पार पाडण्यासाठी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अॅड. बाबासाहेब जाधव काम पाहत आहेत. त्यांना सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अॅड. बसवराज हिंगमिरे, अँड. अविनाश बिराजदार, अॅड. संजय पवार, अॅड. प्रवीण कुलकर्णी, अॅड. विकास कुलकर्णी आणि अॅड. शुभम माने सहकार्य करीत आहेत.
No comments:
Post a Comment