उपजिल्हाधिकारी सतीश बागल यांना मातृशोक
पंढरपूर(कटूसत्य वृत्त):- गादेगांव (ता.पंढरपूर) येथील कै.शांताबाई पांडुरंग बागल (वय 85) यांचे रविवार दि.5 जुलै रोजी वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात 2 मुले, मुलगी, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. मुंबई उपनगरचे उपजिल्हाधिकारी सतीश बागल व बाबासाहेब बागल यांच्या त्या मातोश्री होत्या. गादेगांव येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील नागरिकांसह गादेगावचे ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांचा तिसरा मंगळवार दि. 7 जुलै रोजी होणार आहे.

No comments:
Post a Comment