शिक्षण हाच समाजाच्या प्रगतीचा राजमार्ग : कुंभार
कुंभार समाजातील ४९ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
सोलापूर(कटूसत्य वृत्त):- ज्ञानामुळे माणसाला योग्य दिशा मिळते.उत्तम शिक्षण घेतल्यानंतरच समाजिक मूल्ये आपोआप रुजतात.यामुळे समाजाबरोबरच राष्ट्राचाही सर्वांगीण विकास होतो म्हणून प्रत्येकाने शिक्षणाला महत्त्व द्यावे. शिक्षण हाच समाजाच्या प्रगतीचा राजमार्ग असल्याचे प्रतिपादन नेताजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अण्णाराव कुंभार यांनी केले.
निलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस कन्नड भाषा व कन्नड संस्कृती संवर्धक कुंभार समाज शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने कुंभार समाजातील ४९ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात पार पडला यावेळी अण्णाराव कुंभार बोलत होते. प्रथम श्री वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी व तपोरत्नं योगिराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तदनंतर कुंभार समाजातील दहावी व बारावीच्या ४९ गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकांसह सन्मान करून धनादेश प्रदान करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर
यावेळी संस्थेच्या खजिनदार ललिता कुंभार, माजी जिल्हाध्यक्ष हनुमंत कुंभार, प्राचार्य रविशंकर कुंभार,गुरुसिद्ध कुंभार, लेखापरीक्षक महेश आळंगे, सेवानिवृत्त प्राचार्य रेवणसिद्ध रोडगीकर, सुभाष धुमशेट्टी, विजयकुमार हुल्ले, ज्ञानेश्वर म्हेत्रे, लक्ष्मण यादव , मल्लिकार्जुन गुरव,धर्मराज बळ्ळारी, लक्ष्मीकांत त्रिशूले, मुख्याध्यापक शिवानंद मेणसंगी, मुख्याध्यापिका वैशाली कुंभार, विजयालक्ष्मी कुंभार, पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे अण्णाराव कुंभार म्हणाले, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव हा समाजाच्या उज्ज्वल भविष्यास दिशा देणारा उपक्रम आहे. श्रम, जिद्द आणि प्रामाणिकपणाच्या बळावर यश मिळविता येते. बदलत्या काळात पारंपरिक व्यवसायासमोरील आव्हाने लक्षात घेता शिक्षण हाच समाजाच्या प्रगतीचा प्रभावी मार्ग असल्याचे सांगून पालकांनी मुलांवर चांगले संस्कार करावेत. प्रामाणिकपणा, जबाबदारी आणि आई-वडिलांप्रती आदर हीच यशाची खरी गुरुकिल्ली असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.कुंभार समाजाचे माजी जिल्हाध्यक्ष हनुमंत कुंभार म्हणाले, अण्णाराव कुंभार यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे.त्यांनी संघर्ष, परिश्रम आणि चिकाटीतून शिक्षणाची गंगा समाजाच्या घराघरांत पोहोचवली. अनेक वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. त्यांच्या कार्यातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन समाजऋण फेडण्याची भावना जोपासावी. गुणवंत होण्याबरोबरच संस्कारित आणि चारित्र्य जपणारा नागरिक बनणे अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
सेवानिवृत्त प्राचार्य रेवणसिद्ध रोडगीकर म्हणाले, विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शिक्षणाच्या बळावर यश संपादन करावे, पालकांच्या कष्टांची जाणीव ठेवून ध्येयपूर्तीसाठी सातत्याने प्रयत्न करावेत. अण्णाराव कुंभार यांनी होतकरू विद्यार्थ्यांसाठी केलेले कार्य अनुकरणीय असून समाजातील सक्षम व्यक्तींनी शिक्षणासाठी मदतीचा हात पुढे करावा, असे पुढे त्यांनी आवाहन केले. यावेळी समाजातील बाबुराव कुंभार, मल्लिकार्जुन कुंभार, विजयकुमार कुंभार, श्रीशैल कुंभार, प्रविण कुंभार, विठ्ठल कुंभार, सिद्धाराम कुंभार, चंद्रकुमार कुंभार, गोदावरी कुंभार, उमादेवी कुंभार आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वाराध्य मठपती यांनी केले, तर मुख्याध्यापिका वैशाली कुंभार यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गणपती पाटील, राजेंद्र मुलगे, शिवानंद पुजारी, प्रकाश कोरे, मीनाक्षी वांगीकर, विनायक कोरे, चंद्रशेखर पाटील, रेवणसिद्ध दिसले आदी परिश्रम घेतले.
*चौकट*
*यांचा झाला सन्मान*
अक्षय कुंभार (९३.८३),तेजस्वी कुंभार (९३.८०), अनुराधा कुंभार (९१.२०), वैभवी कुंभार (९०.२०),काजल कुंभार (८८.८०), राजकुमार कुंभार (८८.८०), हर्षवर्धन कुंभार (८४.६०),भक्ती कुंभार (८४.००), विठ्ठल कुंभार (८२.६०),संजोती कुंभार (८०.४०),ओम कुंभार (८०.१६) या विद्यार्थ्यांसह ४९ कुंभार समाजातील दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
.jpg)
No comments:
Post a Comment