कन्हेरगावातील सुमन मोरे यांचे निधन.
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- कन्हेरगाव (ता. माढा) येथील सौ. सुमन लिंबाजी मोरे (वय ७२) यांचे फुफ्फुसाच्या आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, चार मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे.
त्या कन्हेरगाव येथील श्री गणेश सहकारी पाणीपुरवठा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष लिंबाजी मोरे यांच्या पत्नी होत. तसेच टेंभुर्णीच्या सरपंच सुरजा बोबडे, भाजप महिला आघाडीच्या माजी जिल्हाध्यक्षा धनश्री खटके-पाटील, तालुका शेती अधिकारी देवराव चव्हाण यांच्या पत्नी शलाका चव्हाण तसेच कन्हेरगाव ग्रामपंचायतीचे माजी सदस्य प्रसाद मोरे यांच्या त्या मातोश्री होत.
त्यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला.

No comments:
Post a Comment