स्व.अजितदादांच्या सहाव्या मासिकानिमित्त नवरंगे बालकाश्रमात आटा चक्की व शालेय साहित्याचे वाटप - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, July 30, 2026

स्व.अजितदादांच्या सहाव्या मासिकानिमित्त नवरंगे बालकाश्रमात आटा चक्की व शालेय साहित्याचे वाटप

स्व.अजितदादांच्या सहाव्या मासिकानिमित्त नवरंगे बालकाश्रमात आटा चक्की व शालेय साहित्याचे वाटप


पंढरपूर  (कटूसत्य वृत्त):-   उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सहाव्या मासिकानिमित्त पंढरपूर येथील नवरंगे बालकाश्रमात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांच्या वतीने सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी बालकाश्रमाला आटा चक्की भेट देण्यात आली तसेच तेथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे बालकाश्रमातील विद्यार्थ्यांना दैनंदिन गरजांसह शिक्षणासाठीही मोलाची मदत मिळणार आहे.
यावेळी युवराज मुचलंबे, ओम झाडबुके व इतर उपस्थित होते.
गेल्या ६ महिन्यापासून श्रीकांत शिंदे हे नेहमी वेगवेगळा उपक्रम राबवून अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत आहेत.  आजपर्यंत लिंक रोड येथील डिव्हाडर मध्ये वृक्षारोपण, असेल जेष्ठ नागरिक यांना वाचनालय, बालकाश्रम येथे अन्नदान, आज गरजू मुलींना सायकल अन वही वाटप कार्यक्रम साजरे करत असताना आपल्या नेत्याप्रती असलेल्या प्रेम अन त्यांनी घालून दिलेली शिकवण जपणारे कार्यकर्ता घडले पाहिजेत अशी भावना ते व्यक्त करतात.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी सामाजिक बांधिलकी जपत अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविण्याची गरज व्यक्त केली. विद्यार्थ्यांनीही या उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त करत श्रीकांत शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानले. हा उपक्रम समाजाप्रती असलेली संवेदनशीलता आणि सेवाभाव अधोरेखित करणारा ठरला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages