पत्रकार शितलकुमार मोटे यांना 'कारगिल योद्धा विशेष आदर्श पत्रकार पुरस्कार' प्रदान
करमाळा (कटूसत्य वृत्त):- पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत, करमाळयातील Tv 9 मराठी या वृत्तवाहिनीचे पत्रकार शितलकुमार मोटे यांना प्रतिष्ठेचा 'कारगिल योद्धा विशेष आदर्श पत्रकार पुरस्कार' करमाळा येथे प्रदान करण्यात आला आहे.
आजी-माजी सैनिक कल्याणकारी मंडळ आणि यशकल्याणी सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने एका विशेष कार्यक्रमात हा पुरस्कार त्यांना गौरविण्यात आला. जनहिताच्या, शेतकऱ्यांच्या सामाजिक मुद्द्यांवर सतत जागरूक राहून पत्रकारितेच्या माध्यमातून मोलाचे योगदान दिल्याबद्दल शितलकुमार मोटे यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला.
या पुरस्कार वितरण सोहळ्यात सामाजिक, आजी माजी सैनिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित होते. सैनिकांच्या कल्याणासाठी आणि सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी झटणाऱ्या या दोन्ही संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते शितलकुमार मोटे यांना मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

No comments:
Post a Comment