हायकोर्टानं झापल्यानंतर मोदी सरकारला आली जाग!
वांगचुक यांना पुरवणार सुविधा
प्रत्येक नागरिकाचे आयुष्य मौल्यवान! हायकोर्टाकडून वांगचुक यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त
नवी दिल्ली (वृत्त सेवा):- सामाजिक/पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचा कॉक्रोच जनता पार्टीच्या व्यासपीठावर उपोषणाचा १९वा दिवस आहे. आत्तापर्यंत त्याचं ९ किलो वजन घटलं आहे, त्यामुळं त्यांची प्रकृती ढासाळत असून सर्वांनाच त्यांच्या प्रकृतीची काळजी वाटत आहे.
पण मोदी सरकारनं त्यांच्याकडं साफ दुर्लक्ष केलं आहे. याचमुळं हायकोर्टानं आता सरकारला चांगलंच झापलं आणि वांगचुक यांना सुविधा पुरवण्याचे आदेशही दिले. त्याला अनुसरुन सरकारलाही आता याची दखल घेणं भाग पडलं.
हायकोर्टानं काय म्हटलं?
दिल्ली हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश डी. के. उपाध्याय आणि न्या. तेजस करिया यांच्या खंडपीठासमोर सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबाबत दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी खंडपीठानं उपोषणाला बसलेल्या वांगचुक यांना तात्काळ वैद्यकीय मदत उपलब्ध करुन देण्याचे आदेश दिले. हायकोर्टानं यावेळी केंद्र सरकारला विचारणा केली की, सोनम वांगचुक यांचं नियमित आरोग्य तपासणी केली जात आहे का? यावर सरकारची बाजू मांडणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी कोर्टाला सांगितलं की, जेव्हापासून वांगचुक यांनी तपासणीसाठी परवानगी दिली आहे, तेव्हापासून त्यांची नियमित तपासणी केली जात आहे.
दररोज हेल्थ चेकअपचे निर्देश
हायकोर्टानं पुढे असंही म्हटलं की, सोनम वांगचुक यांचं जीवन किंमती आहे. यावर सॉलिसिटर जनरल यांनी उत्तर दिलं की, प्रत्येक व्यक्तीचं जीवन बहुमुल्य आहे. सर्व पक्षांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर दिल्ली हायकोर्टानं याचिका निकाली काढली. अधिवक्ता राकेश कुमार सैनी यांनी ही याचिका दाखल केली होती.
याचिकेत काय म्हटलं होतं?
याचिकाकर्ते आणि अधिवक्ता राकेश कुमार सैनी यांनी बुधवारी कोर्टाला म्हटलं की, ही अत्यंत दुःखद आणि दुर्देवी स्थिती आहे. एक मानवाधिकार कार्यकर्ता जे आपल्या मुलभूत अधिकारांचा वापर करत शांततापूर्ण आंदोलन करत आहे. संपूर्ण देशासमोर ते आपला जीव देण्याच्या स्थितीत आहेत. (यासाठी त्यांनी जपानमध्ये आत्महत्येसाठी वापरला जाणारा 'हाराकिरी' हा शब्द वापरला आहे.) याचिकाकर्त्यांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर दिल्ली हायकोर्टानं या प्रकरणी सुनावणीला मंजुरी दिली. तसंच केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारकडून या प्रकरणी उत्तर मागवलं.
वांगचुक यांचं आवाहन
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर नीट परीक्षेत कथित गैरप्रकारांच्या चौकशीच्या मागणीवरुन जंतर-मंतरवर बेमुदत उपोषण करत असलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची प्रकृती सातत्यानं ढासाळत आहे. गुरुवारी त्यांच्या उपोषणाचा १९ वा दिवस आहे. उशीरा रात्री वांगचुक यांनी शेअर केलेल्या एका व्हिडिओ संदेशात ५९ वर्षीय वांगचुक यांनी म्हटलं की, "मी पूर्णपणे ठीक नाही आणि खूपच वाईट अवस्थेत देखील नाही. त्यामुळं मला उपोषण सोडण्याचं आवाहन कोणी करु नये, उलट २० जुलै रोजी आयोजित करण्यात आलेल्या चलो संसद या मोर्चामध्ये सहभागी होऊन आंदोलन अधिक मजबूत करावं"
.jpg)
No comments:
Post a Comment