पूरग्रस्त शेतकऱ्यांची प्रलंबित मदत त्वरित वितरित करण्याचे आदेश - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, July 9, 2026

पूरग्रस्त शेतकऱ्यांची प्रलंबित मदत त्वरित वितरित करण्याचे आदेश

 पूरग्रस्त शेतकऱ्यांची प्रलंबित मदत त्वरित वितरित करण्याचे आदेश

आ. राजू खरे यांच्या पाठपुराव्याला यश; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश



पंढरपूर (कटूसत्य वृत्त) : मोहोळ विधानसभा मतदारसंघातील अतिवृष्टी व सीना नदीच्या महापुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची तांत्रिक कारणांमुळे रखडलेली नुकसानभरपाई तातडीने वितरित करण्याचे आदेश राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. आमदार राजू खरे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची दखल घेत मंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याने बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

जून ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत मोहोळ मतदारसंघात झालेल्या अतिवृष्टी आणि सीना नदीच्या महापुरामुळे हजारो शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. अनेकांची उभी पिके वाहून गेली, घरांचे नुकसान झाले, जनावरे दगावली किंवा वाहून गेली, तसेच अनेक शेतजमिनी खरडून गेल्या होत्या. प्रशासनाने पंचनामे करून शासनाकडे मदतीचा प्रस्ताव पाठविल्यानंतर निधी मंजूर झाला आणि दोन हेक्टरपर्यंत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचे वितरण करण्यात आले.

मात्र, दोन हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मदत महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलवरील तांत्रिक अडचणींमुळे प्रलंबित राहिली. त्यामुळे अनेक शेतकरी हक्काच्या मदतीपासून वंचित राहिल्याने नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते.

या प्रश्नाची गंभीर दखल घेत आमदार राजू खरे यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतरही प्रश्न मार्गी न लागल्याने त्यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. तांत्रिक त्रुटींमुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपासून वंचित ठेवू नये आणि प्रलंबित मदत तातडीने वितरित करावी, अशी मागणी त्यांनी केली.

आमदार खरे यांच्या मागणीची तत्काळ दखल घेत महसूल मंत्री बावनकुळे यांनी मदत व पुनर्वसन विभागाच्या सचिवांना निवेदनावरच आवश्यक कार्यवाही करून नुकसानभरपाई त्वरित वितरित करण्याचे आदेश दिले. या निर्णयामुळे महाडीबीटी पोर्टलवरील तांत्रिक त्रुटी दूर करून रखडलेली मदत लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

प्रलंबित मदतीचा तपशील :

  • वितरण अयशस्वी: ५६७ खातेदार – ₹२,१०,६२,४०२

  • पुनर्पडताळणी प्रलंबित: ७३ खातेदार – ₹२३,८७,४४०

महसूल मंत्र्यांच्या आदेशानंतर ही संपूर्ण प्रलंबित मदत लवकरच वितरित होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून, यामुळे पूरग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages