आषाढी वारी निमित्त नातेपुते येथे दहशतवादविरोधी मॉक ड्रिल - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, July 10, 2026

आषाढी वारी निमित्त नातेपुते येथे दहशतवादविरोधी मॉक ड्रिल

 आषाढी वारी  निमित्त नातेपुते येथे दहशतवादविरोधी मॉक ड्रिल




नातेपुते (कटूसत्य वृत्त):- आषाढी वारी २०२६ पालखी सोहळा १९ जुलै रोजी सोलापूर जिल्ह्यात येत असून पालखी सोहळ्याचा पहिला मुक्काम नातेपुते येथे होत आहे. पालखी सोहळा आषाढी वारी शांततापूर्ण सुरक्षित व उत्साह पूर्ण वातावरणात पार पाडावी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्यास तातडीने व प्रभावीपणे प्रतिसाद देता यावा तसेच भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नातेपुते शहरातील एसटी स्टँड परिसरात बीडीएस (बॉम्ब शोध व निकामी करणारे
पथक, क्यूआरटी/आरसीपी पथक, पोलीस मुख्यालय सोलापूर ग्रामीण तसेच नातेपुते पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने दहशतवादविरोधी मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले होते.
सदर मॉक ड्रिल मा. पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, अकलूज व  सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांच्या उपस्थितीत पार पडले. या मॉक ड्रिलद्वारे संशयास्पद वस्तू आढळल्यास तात्काळ प्रतिसाद देणे, परिसर सुरक्षित करणे, नागरिकांचे स्थलांतर, बॉम्ब शोधून निकामी करण्याची कार्यपद्धती तसेच विविध आपत्कालीन परिस्थितींना प्रभावीपणे सामोरे जाण्याचा सराव करण्यात आला.आषाढी वारीदरम्यान भाविकांच्या सुरक्षिततेस सर्वोच्च प्राधान्य देत पोलीस प्रशासन सतर्क असून, नागरिकांनी कोणतीही संशयास्पद वस्तू अथवा व्यक्ती आढळल्यास तात्काळ नातेपुते पोलीस ठाणेशी  संपर्क साधून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages