धनगर समाजाच्या प्रश्नांसाठी कटिबद्ध; भरघोस निधी देण्याची ग्वाही : आमदार सचिन कल्याणशेट्टी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, July 9, 2026

धनगर समाजाच्या प्रश्नांसाठी कटिबद्ध; भरघोस निधी देण्याची ग्वाही : आमदार सचिन कल्याणशेट्टी

 धनगर समाजाच्या प्रश्नांसाठी कटिबद्ध; भरघोस निधी देण्याची ग्वाही : आमदार सचिन कल्याणशेट्टी



अक्कलकोट (कटूसत्य वृत्त) : तालुक्यातील धनगर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असून, समाजाच्या कोणत्याही प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी प्राधान्याने प्रयत्न केले जातील. विकासकामांसाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देण्यासही आपण मागे राहणार नाही, अशी ग्वाही आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली.

अक्कलकोट येथील बिरदेव मंदिर परिसरात संत बाळूमामा सांस्कृतिक सभागृहाच्या भूमिपूजन समारंभात ते बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, धनगर समाजाने आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहत भरघोस मताधिक्याने निवडून दिले. या विश्वासाचे ऋण विकासकामांच्या माध्यमातून फेडण्याचा आपला प्रयत्न राहील. समाजाच्या प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीबरोबरच विविध विकासकामांसाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

भाजप हा सर्व जाती-धर्मांना समान न्याय देणारा पक्ष असून समाजातील प्रत्येक घटकाच्या विकासासाठी कार्यरत असल्याचेही आमदार कल्याणशेट्टी यांनी यावेळी नमूद केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी होते. यावेळी अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले, समर्थनगरचे माजी सरपंच प्रदीप पाटील, उपनगराध्यक्ष बंटी राठोड, जिल्हा परिषद सदस्य विकास बुळ्ळा, भाजप जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्ष नन्नू कोरबू, नगरसेवक लक्ष्मीकांत धनशेट्टी, विजय राठोड, विश्रांत गायकवाड, अप्पासाहेब बिराजदार आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात धनगर समाजाचे नूतन नगरसेवक संजय घोडके यांचा आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक देवस्थान ट्रस्टचे सचिव स्वामीनाथ घोडके यांनी केले.

भूमिपूजन सोहळ्यास तालुका व शहरातील धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गंगाराम पुजारी, बरगली पुजारी, सदाशिव पुजारी, दशरथ कोरे, अशोक कोरे, कमल सोनटक्के, नंदा घोडके आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन शंकर व्हनमाने यांनी केले, तर आभार काशीनाथ आलूरकर यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages