भाजप महिला मोर्चा अकलूज शहर उपाध्यक्षपदी कोमलताई भोसले यांची निवड - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, July 2, 2026

भाजप महिला मोर्चा अकलूज शहर उपाध्यक्षपदी कोमलताई भोसले यांची निवड

भाजप महिला मोर्चा अकलूज शहर उपाध्यक्षपदी कोमलताई भोसले यांची निवड



अकलूज (कटूसत्य वृत्त):- अकलूज येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ.कोमलताई शशिकांत भोसले यांची अकलूज शहर भारतीय जनता मोर्चा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. सदर निवडीचे पत्र सोलापूर जिल्हा प्रभारी तथा माजी आमदार संजय जगताप व सोलापूर जिल्हा अध्यक्ष चेतनसिंह केदार यांच्या हस्ते देण्यात आले.
       यावेळी, जिल्हा सरचिटणीस सचिन शिंदे, अकलूज मंडल  अध्यक्ष सुजय माने-पाटील, अकलूज शहर अध्यक्ष महादेव कवळे,नगरसेविका सौ. जयश्री एखतपुरे, नगरसेविका सौ. दिपाली वाघमोडे, नगरसेवक महेश शिंदे, नगरसेवक राहुल लोंढे, शरद मदने, निलेश ननवरे व अकलुज मंडलातील प्रमुख नेते, जिल्हा व तालुका पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 *चौकट*
सौ.कोमलताई शशिकांत भोसले या शांत, संयमी आणि नम्र स्वभावाच्या आहेत.त्यांच्याकडे असलेली उत्कृष्ट विचारसरणी, उत्कृष्ट संवाद, उत्कृष्ट संघटन कौशल्य तर सर्वच महापुरुष यांचे जयंती निमित्त विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवणे, यामुळे अकलूज परिसरातील कित्येक महिला भगिनी त्यांच्या सान्निध्यात कार्यरत आहेत.त्यांच्या निवडीमुळे अकलूज परिसरात आनंदाचे वातावरण पसरले असून, त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages