अक्कलकोट नगरीत तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये, भेसळखोरांना 16 हजारांचा दंड
सोलापूर जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. अन्न व औषध अधिकाऱ्यांनी स्वा मी समर्थांच्या अक्कलकोट शहरामध्ये श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरातील अन्न व्यावसायिकांची एकूण 23 तपासण्या केल्या आहेत. पेढा आणि बर्फीचे नमूने तपासणीसाठी घेण्यात आलेले आहेत. सदर नमुन्यांचे विश्लेषण अहवाल प्रलंबित आहेत. विशेष म्हणजे केवळ अक्कलकोट नाही तर या महिन्यात अन्न व औषध विभागाच्या कर्मचाऱ्यांनी संपूर्ण जिल्ह्यातच अन्नात भेसळ होत आहे की नाही याची तपासणी मोहीम हाती घेतली आहे.
अक्कलकोटमध्ये स्वामींच्या नगरीत भेसळखोराना सोळा हजार दंड
स्वामी समर्थांच्या नगरीत व्यावसायिकांच्या ३० तपासण्या करण्यात आलेल्या होत्या. त्यापैकी १३ अन्न व्यावसायिकांविरुध्द कलम ६९ नुसार तडजोड प्रकरणे दाखल करुन एकुण १६ हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे. हा दंड शासनखाती जमा करण्यात आला आहे. तसेच २ पेढींना सुधारणा नोटीस पाठविण्यात आल्याचीही माहिती सहाय्यक आयुक्त देसाई यांनी दिली आहे.
अक्कलकोटमध्ये विशेष मोहीम राबवून तपासणी केली जाणार
सहायक आयुक्त देसाई यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, यापुढे देखील गोपनीय माहितीच्या आधारे अक्कलकोटमध्ये अन्न आस्थापनांची विशेषत: हॉटेल, कॅन्टीन, रेस्टॉरंट आणि इतर आस्थापना यांची विशेष तपासणी करण्यात येणार आहे. अन्न व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यांचे नियमांचे पालन करावे, तसेच नियमांचे उल्लंघन होत असल्याचे तपासणीवेळी आढळून आल्यास योग्य ती कारवाई केली जाणार आहे.
तुकाराम मुंढेच्या धास्तीने सोलापुरातील अधिकारी खडबडून जागे
राज्यातील अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी धडाकेबाज आदेश काढताच सोलापूरचे अन्न व भेसळ कार्यालयाचे अधिकारी-कर्मचारी खडबडून जागे झाले आहेत. एकाच महिन्यात जिल्ह्यातील विविध ठिकाणी छापे टाकून कोट्यवधींचा भेसळ माल हस्तगत केला आहे.
दरम्यान, आषाढी वारीतही या विभागाकडून विविध पथके स्थापन करण्यात आली आहेत. अधिकाऱ्यांकडून मायक्रोप्लॅनिंग करण्यात आले आहे. अन्न आणि औषध प्रशासनाकडून राज्यभरात धाडसत्र सुरु आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाला हानी होईल, असं खाद्य पदार्थ विकणाऱ्या हॉटेल, मिठाईचे दुकाने यांच्यावर मोठी कारवाई होत आहे.
.png)
No comments:
Post a Comment