कारगिलच्या वीरांना बार्शीत अभिवादन; शहीद स्मारकावर विजय दिवस उत्साहात - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, July 28, 2026

कारगिलच्या वीरांना बार्शीत अभिवादन; शहीद स्मारकावर विजय दिवस उत्साहात

 कारगिलच्या वीरांना बार्शीत अभिवादन; शहीद स्मारकावर विजय दिवस उत्साहात



बार्शी (कटूसत्य वृत्त) :- कारगिल विजय दिनानिमित्त बार्शी शहरातील शहीद स्मारक येथे कारगिल विजय दिवस अत्यंत देशभक्तीपूर्ण, भावनिक आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी कारगिल युद्धातील शूरवीर जवानांना पुष्पचक्र अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

या कार्यक्रमाला आमदार राजेंद्र राऊत, जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, जिजाऊ गुरुकुलचे संस्थापक अध्यक्ष संभाजी घाडगे, नगराध्यक्षा तेजस्विनी कथले, बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन विजय गरड, माजी सैनिक परिषदेचे अध्यक्ष मेजर सुरवसे तसेच बार्शी पोलीस स्टेशनचे गणेश कुंभार यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी कारगिल युद्धातील भारतीय सैनिकांच्या अद्वितीय शौर्य, पराक्रम आणि राष्ट्रनिष्ठेचा गौरव केला. देशाच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीर जवानांच्या बलिदानाचे स्मरण करत त्यांना कृतज्ञ अभिवादन करण्यात आले.

यावेळी युवकांनी कारगिलच्या वीर सैनिकांकडून प्रेरणा घेऊन राष्ट्रसेवेसाठी सदैव तत्पर राहावे, असे आवाहनही मान्यवरांनी केले. कार्यक्रमात जिजाऊ गुरुकुल, खांडवी येथील शिक्षक, विद्यार्थी तसेच नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत शहीद जवानांना विनम्र अभिवादन केले.

देशभक्ती, राष्ट्रप्रेम आणि शौर्याची प्रेरणा देणारा हा कार्यक्रम बार्शीकरांसाठी अविस्मरणीय ठरला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages