महापालिका प्रशासनात मोठी खांदेपालट; अविनाश वाघमारे नगर रचना तर प्रकाश दिवाणजी झोनला
सोलापूर (कटूसत्य वृत्त): सोलापूर महानगरपालिकेच्या प्रशासनात मोठी खांदेपालट करण्यात आली असून प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान, परिणामकारक आणि समन्वयपूर्ण करण्याच्या उद्देशाने अभियंते, तांत्रिक कर्मचारी, अनुरेखक, भूमापक, आरोग्य निरीक्षक तसेच मानधनावरील कनिष्ठ अभियंत्यांच्या मोठ्या प्रमाणावर अंतर्गत बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या आदेशानुसार संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तत्काळ नवीन पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या बदल्यांमुळे नगर अभियंता, नगर रचना, घनकचरा व्यवस्थापन, सार्वजनिक आरोग्य अभियंता कार्यालय तसेच विविध विभागीय कार्यालयांतील कामकाजात अधिक समन्वय साधून विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा आयुक्तांनी व्यक्त केली आहे.
बदली झालेल्यांमध्ये उपअभियंता अविनाश वाघमारे यांची नगर रचना विभागात, तर सहायक अभियंता प्रकाश दिवाणजी यांची झोन कार्यालयात नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच म. हनीफ बक्षी, राघवेंद्र गायधनकर, श्याम कन्ना, इर्शाद हुसेन जरतार, सुनीता हिवारे, प्रमोद गोविंदवार, दयानंद आवताडे आणि गणेश काकडे यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत.
याशिवाय अभिजित बिराजदार यांची घनकचरा व्यवस्थापन विभागातून नगर अभियंता कार्यालयात, आदिनाथ कांबळे यांची सार्वजनिक आरोग्य अभियंता कार्यालयातून नगर रचना विभागात, राहुल अडलिंगे यांची नगर अभियंता कार्यालयातून विभागीय कार्यालय क्रमांक १ मध्ये, तर लैला नदाफ यांची नगर अभियंता कार्यालयातून नगर रचना विभागात बदली करण्यात आली आहे.
अनिरुद्ध गदगे, दीपाली मेटकरी, महेंद्र बोटे, विक्रांत लोकापुरे, आशिष घुले, अजिंक्य साळुंके, परशुराम बोंमकंटी, लायेका मनगोळी, इम्तियाज नदाफ, शिवाजी नलावडे, किशोर फत्तेवाले, सूरज ढवळे आणि सौरभ क्षीरसागर यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांची विविध विभागांत बदली करण्यात आली आहे. भूमापक भारत रोडगे, सुफियान पठाण, सलीम पटेल, राजकुमार कावळे, एस. टी. कोळी आणि आर. बी. शिवसिंगवाले यांनाही नवीन पदस्थापना देण्यात आली आहे.
आरोग्य निरीक्षकांमध्ये नितीन नरळे, सोमनाथ ताकभाते, राहुल गदवालकर, अंजली काकडे आणि प्रकाश नरळे यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तसेच कनिष्ठ अभियंते विश्वजीत कवठे, भाऊसाहेब गेजगे, श्रीशैल उटगी, प्रणोती कदम, पूजा देशमाने, अंबिगार, विवेकानंद स्वामी आणि प्रतीक कोल्हे यांच्याही विभागीय बदल्या करण्यात आल्या आहेत.
मानधनावरील कनिष्ठ अभियंते अंजना कोने, चेतन प्रचंडे, दीपक कुंभार, सलमान मणियार, बसवराज बडगा, सागर खरोसेकर, पूनम कांबळे, अनिकेश मिठ्ठा आणि कल्याणी बिराजदार यांच्या बदल्यांचाही आदेशात समावेश आहे.
महापालिका आयुक्तांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना तत्काळ नवीन पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू होऊन कार्यभार स्वीकारण्याचे निर्देश दिले असून विभागप्रमुखांनी 'चार्ज ट्रान्सफर सर्टिफिकेट' पूर्ण करून रुजू अहवाल सामान्य प्रशासन विभागाकडे सादर करावा, असे स्पष्ट केले आहे.
दरम्यान, पदस्थापनेच्या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा राजकीय अथवा संघटनात्मक दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्यास महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९७९ मधील नियम २३ नुसार संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी आदेशात दिला आहे.
No comments:
Post a Comment