सोलापूरात रविवारी अल्पसंख्यांक समाज जागरूकता मेळावा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, July 10, 2026

सोलापूरात रविवारी अल्पसंख्यांक समाज जागरूकता मेळावा

 सोलापूरात रविवारी अल्पसंख्यांक समाज जागरूकता मेळावा 

शासकीय योजना, शिष्यवृत्ती व स्वयंरोजगाराबाबत मिळणार मार्गदर्शन



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शिवसेना अल्पसंख्यांक विभाग, सोलापूर शहराच्या वतीने "शिक्षण, स्वावलंबन आणि सशक्तीकरणाकडे एक पाऊल" या संकल्पनेवर आधारित अल्पसंख्यांक समाज जागरूकता मेळाव्याचे आयोजन रविवार दि. १२ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता इम्पेरियल पॅलेस येथे करण्यात आल्याची माहिती शहर प्रमुख अब्दुल गफूर शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
          या मेळाव्याचे उद्घाटन राज्यसभा खासदार तथा शिवसेना राज्य प्रवक्त्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांच्या हस्ते होणार असून खासदार धैर्यशील माने प्रमुख उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानपरिषद आमदार तथा शिवसेना अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद खान राहणार आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे अध्यक्ष तथा शिवसेना अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष समीर काझी यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.यावेळी माजी गृह राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी क्रीडामंत्री उत्तमप्रकाश खंदारे, नगरसेवक अमोल शिंदे, जिल्हाप्रमुख अमर अण्णा पाटील, मनीष काळजे, मनोज शेजवाल, माजी आ. शहाजी पाटील, महेश साठे, प्रियदर्शन साठे, अनिकेत पिसे, नगरसेविका मनोरमा सपाटे, सचिन चव्हाण, श्रीनिवास संगा, रजाक मालक, ऐजाज शेख, शाहबाज बागवान, सिराज शेख, रियाज मुलानी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 
          या मेळाव्यात महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्यांक विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती नागरिकांना दिली जाणार आहे. यामध्ये उच्च व व्यावसायिक शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, बारावीनंतरच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य, वसतिगृह सुविधा, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या स्वयंरोजगार व व्यवसाय कर्ज योजना, कौशल्य विकास प्रशिक्षण, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, महाडीबीटी शिष्यवृत्ती, महिला उद्योजकता प्रोत्साहन तसेच परदेशातील उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य आदी योजनांचा समावेश आहे.
        या पत्रकार परिषदेस रजाक मुजावर, सलाउद्दीन शेख, एजाज शेख आदी उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages