मिसिंग लिंक'बद्दल बोलले तर यात महाराष्ट्राचा अपमान कुठे आला? - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, July 10, 2026

मिसिंग लिंक'बद्दल बोलले तर यात महाराष्ट्राचा अपमान कुठे आला?

 मिसिंग लिंक'बद्दल बोलले तर यात महाराष्ट्राचा अपमान कुठे आला?

           सोडणार नाही' म्हणणाऱ्या फडणवीसांवर राज ठाकरे प्रचंड भडकले
 मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावरून विरोधक आक्रमक




मुंबई (कटूसत्य वृत्त):- मुंबई-पुणे महामार्गावरील 'मिसिंग लिंक'वर दरड कोसळल्याचं दिसून आलं होतं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर विरोधक, नेटीझन्स यांनी सत्ताधारी आणि सरकारला धारेवर धरलं.

यावरुन संतापलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना फटकारलं. तसेच माझी बदनाम करा, पण महाराष्ट्राची बदनामी कराल तर कोणालाही सोडणार नाही, अशा इशाराही मुख्यमंत्र्‍यांनी दिला. हीच बाब आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना खटकली.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुरुवारी (ता.9 जुलै) रेल्वे कामगार सेनेचा वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात मिसिंग लिंक विविध मुद्द्यांवरुन फडणवीस सरकार, मुख्यमंत्री यांच्यावर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी विधानसभेतील मुख्यमंत्री फडणवीसांच्या खटकलेल्या भाषणाचा समाचार घेताना त्यांचा पहिल्यांदाच एकेरी उल्लेख केला.

राज ठाकरे म्हणाले, स्वत:च्या अंगाशी आल्यावर ते राजकारण. असं कसं होईल. काय म्हणतात म्हणे, एकवेळ मला बोला. पण महाराष्ट्राचा अपमान मी सहन करणार नाही. वा रे वा. लोकं त्या मिसिंग लिंकवर बोलतायत. महाराष्ट्राचा कुठे अपमान होतोय अशा शब्दांत त्यांनी आपल्या ठाकरे शैलीत फडणवीसांवर निशाणा साधला.

मनसे अध्यक्षांनी केंद्र सरकारची सवय लागली आहे. केंद्राच्या कोणत्या गोष्टीबद्दल बोललं, तर तुम्ही देशद्रोही" असा आरोपही यावेळी फडणवीस सरकारवर केला. तसेच मिसिंग लिंकवरुन मुख्यमंत्री विधानसभेत बोलतात बघून घेईन, अरे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहेस ना तू अशा एकेरी भाषेतच राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांच्या भाषणाचा समाचार घेतला.

राज ठाकरे यांनी यावेळी आपल्या भाषणात मिसिंग लिंकबद्दल बोललं, तर त्यात कुठे आला महाराष्ट्राचा अपमान. लोकांनी प्रश्न विचारायचे नाही का ? अशी संतप्त विचारणाही केली. इतके दिवस मोबाईलवरून विरोधकांना शिव्या घालायचे ते अंगलट आलंय. दामदुपटीने यांच्या अंगलट आलं. आता त्रास होतोय. तुम्हीच सुरू केल्या या गोष्टी. 10-12 वर्षात तुम्हीच सुरू केलं. वाईट साईट बोलणं, घाण बोलणं तुमच्या टीमने केल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं.

मनसे प्रमुखांनी यावेळी फडणवीसांच्या 'राजकारण करू नका' या सभागृहातील वक्तव्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. ते म्हणाले, वा रे वा, त्याचं राजकारण करू नका म्हणे. त्याच्यावर बोललं की राजकारण? आपण इतकी वर्षे विरोधात असताना काय करत होतात, दुसऱ्यांची सरकारं असताना आपण जी आंदोलनं केली ते राजकारण नव्हतं का? आता स्वतःच्या अंगाशी आल्यावर विरोधक राजकारण करतात, असे तुम्ही बोलताय असा टोलाही त्यांनी लगावला.

राज ठाकरे म्हणाले, भाजपचे लोक म्हणतात, नैसर्गिक गोष्ट आहे. त्यात राजकारण आणू नका. लक्षात ठेवा. तुम्ही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेला नाहीत. उद्या कुणी असं केलं तर नैसर्गिक गोष्ट आहे असंच सांगा. लोकांना सांगा. झाड पडून मुलगा जातो. माणूस जातो. मुलगा गटारात पडतो. म्हणे नैसर्गिक आहे. नैसर्गिक? तुमचं सरकार असल्यावर नैसर्गिक. इतरांचं असल्यावर राजकारण करणार अशी टीकेची झोडही त्यांनी यावेळी उठवली.

 'भाडे के टट्टू', 'कुत्रा' म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी - संजय राऊत

जनतेच्या कराच्या पैशातून एक प्रकल्प निर्माण करायचा. मूळ किंमतीपेक्षा जास्त किमतीने तो प्रकल्प पूर्ण करायचा. म्हणजे जनतेच्या पैशातील 200-500 कोटी खिशात घालायचे. मग त्या प्रकल्पाचा गाजावाजा करायचा. टीव्हीचे कॅमेरे लावायचे. आमच्यासारखे कुणीच नाही असे सांगायचे. आम्ही नसतो तर हा प्रकल्प झालाच नसता अशी निवेदने करायची. जनतेला मूर्ख बनवायचे आणि त्यानंतर हा प्रकल्प जेव्हा कोसळून पडतो, जनतेच्या कराचा पैशाला अशा प्रकारे भगदाडे पडतात आणि त्यावर जनता व्यक्त झाली की तिला ‘भाडे के टट्टू’, ‘कुत्रा’ असे म्हणून त्यांची चेष्टा करायची. हे फक्त सुल्तानाच्या राज्यात होऊ शकते. हे सुलतानाचे राज्य आहे आणि सुलतानाबरोबर जे आजूबाजूला निजाम बसले आहेत ते सगळे फिदीफिदी हसत टाळ्या आणि बाकं वाजवत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातील ही सुलतानशाही आहे

म्हणे, महाराष्ट्र बदनाम करणाऱ्यांना सोडणार नाही. महाराष्ट्राच्या बदनामीचे सगळ्यात मोठे षडयंत्र जर कुणी रचले असेल तर ते अमित शहा, नरेंद्र मोदी यांनी रचले. खाण तशी माती… मोदी-शहांच्या खाली देवेंद्र फडणवीस आहेत. सत्य बोलणे महाराष्ट्राची बदनामी आहे का? असा सवाल करत संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते असताना देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या बेफाम आरोपांवरही टीका केली. कोरोना काळापासून सर्व विषय काढून जरा ऐकून पहा. महाराष्ट्रातील आमदार-खासदार 50 कोटींना विकले आणि विकत घेतले, ही महाराष्ट्राची बदनामी नाही का? तुम्ही आणदार-खासदार विकत घेत असताना आणि त्यांना घेऊन सरकार बनवले यात राज्याची कुठली बदनामी झाली असे वाटत नाही का? ही महाराष्ट्राची परंपरा कधीच नव्हती, असेही संजय राऊत म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या भाषणात फ्रस्ट्रेशन स्पष्ट दिसतयं, महाराष्ट्राला धमकावून चालणार नाही- आदित्य ठाकरे

यावेळी मुंबईतील प्रश्नांवर बोलण्याऐवजी सरकारच्या चुका दाखवणाऱ्या विरोधकांवर फडणवीस यांनी आगपाखड केली. यावरून शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला. मुख्यमंत्र्यांच्या भाषणात नैराश्य स्पष्टपणे दिसलं पण ते फ्रस्ट्रेशन फडणवीस महाराष्ट्राच्या जनतेवर काढतायत, असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला.

पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी विधीमंडळ परिसरात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या भाषणावर टीका केली. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत काल 2 तास भाषण खेचलं. त्यात फक्त थापा मारल्या. पण त्या भाषणातून त्यांचं फ्रस्ट्रेशन स्पष्ट दिसत होतं. बऱ्याचदा अहंकार हेच नैराश्याचं लक्षण असतं. मुख्यमंत्री महोदयांच्या रूपात काल याचं जिवंत उदाहरण पाहायला मिळालं. मुख्यमंत्री म्हणून हे त्यांचं कदाचित शेवटचं अधिवेशन आहे. कदाचित त्यांना दिल्लीत नेऊन बळजबरीने केंद्रीय कॅबिनेट मंत्री केलं जाईल, जसं शिवराजसिंह चौहान यांना केलं गेलं. पण ते त्यांचं फ्रस्ट्रेशन महाराष्ट्राच्या जनतेवर काढतायत, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages