महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री मा. बाबासाहेब पाटील यांनी आज पंढरपूर येथील कल्याणराव काळे यांच्या संपर्क कार्यालयास सदिच्छा भेट - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, July 20, 2026

महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री मा. बाबासाहेब पाटील यांनी आज पंढरपूर येथील कल्याणराव काळे यांच्या संपर्क कार्यालयास सदिच्छा भेट

 महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री मा. बाबासाहेब पाटील यांनी आज पंढरपूर येथील कल्याणराव काळे यांच्या संपर्क कार्यालयास सदिच्छा भेट



पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री मा. बाबासाहेब पाटील यांनी आज पंढरपूर येथील कल्याणराव काळे यांच्या संपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी कल्याणराव काळे यांच्या हस्ते सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा शालश्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. दोन्ही नेत्यांमध्ये सहकार क्षेत्रातील विविध विषयसाखर उद्योगाची सद्यस्थितीशेतकरी हिताचे प्रश्न तसेच सहकारी संस्थांच्या बळकटीकरणाबाबत सकारात्मक चर्चा झाली. तसेच स्थानिक विकासकामेपतसंस्थाशेतकरी व नागरिकांच्या अडचणींबाबत मंत्र्यांनी आढावा घेतला. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी सहकार क्षेत्राच्या विकासासाठी राज्य शासनाच्या विविध उपक्रमांवर समाधान व्यक्त केले. पंढरपूर तालुक्यातील सहकार क्षेत्राच्या प्रगतीसाठी शासनाकडून आवश्यक सहकार्य मिळेलअसा विश्वासही व्यक्त करण्यात आला. कल्याणराव काळे यांनी सहकार क्षेत्रातील विविध प्रश्न मांडले असून त्यावर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन सहकार मंत्र्यांनी दिले.

सदिच्छा भेटीदरम्यान श्री महादेव भाऊ देठे, राष्ट्रवादी कॉंग्रस पार्टीचे तालुकाध्यक्ष श्री अनिल नागटिळक, श्री जयनाना देशमुख, श्री राजु बापु पाटील,श्री बाळासाहेब काळे गुरुजी, श्री अर्जुन बापु जाधव  विविध पदाधिकारीसंचालककार्यकर्ते व सहकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.भेटीचे वातावरण उत्साहपूर्ण व सकारात्मक होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages