कळंब तालुका पत्रकार संघाचा अन्नदाता पुरस्कार भाऊसाहेब यादव यांना प्रदान........
कळंब तालुका पत्रकार संघाच्या वतीने दिला जाणारा ,"विठ्ठल रुक्मिणी अन्नदाता पुरस्कार ",विठ्ठल नामाच्या गजरात हसेगाव (के) येथील भाऊसाहेब यादव यांना प्रदान करण्यात आला. पत्रकार संघाचे हे सोळावे वर्ष आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक शिंदे हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ वारकरी मुकुंद मोरे,महादेव महाराज अडसूळ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्तावीक विश्वस्त सतीश टोणगे यांनी केले प्रा.जगदीश गवळी यांनी मनोगत व्यक्त केले.पुरस्कार प्राप्त भाऊसाहेब यादव यानी वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठल सेवा असून, या सन्माना मुळे मी कृतार्थ झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
सूत्र संचालन माधवसिंग राजपूत यांनी केले, तर आभार बालाजी निरफळ यांनी मानले.
या वेळी पत्रकार संघाचे सर्व सदस्य,दोस्ती ग्रुप चे सदस्य, ज्येष्ठ नागरिक महासंघाचे पदाधिकारी, विविध पक्षाचे पदाधिकारी, वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.jpg)
No comments:
Post a Comment