महात्मा फुले विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत तब्बल ६७ विद्यार्थी पात्र - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, July 28, 2026

महात्मा फुले विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत तब्बल ६७ विद्यार्थी पात्र

 महात्मा फुले विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत तब्बल ६७ विद्यार्थी पात्र

स्वरा जाधव व वेदिका ढवळे विद्यालयात प्रथम 
टेंभुर्णी परीसरात उत्कृष्ट निकाल देणारी एकमेव शाळा



                टेंभुर्णी(कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत टेंभुर्णी येथील महात्मा फुले उच्च प्राथमिक विद्यालयाने पुन्हा एकदा आपल्या यशाची परंपरा कायम राखत दैदीप्यमान यश संपादन केले आहे. इयत्ता सातवीच्या ५६ पैकी तब्बल ४२ विद्यार्थ्यांनी, तर इयत्ता चौथीच्या २५ विद्यार्थ्यांनी बाजी मारत शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले आहेत. विद्यालयाचे एकूण ६७ विद्यार्थी पात्र ठरल्याने संपूर्ण माढा तालुक्यात शाळेच्या या यशाचे कौतुक होत आहे.

इयत्ता सातवी (उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांमध्ये ढवळे वेदिका २५८ (शाळेत प्रथम), बागवान जोया २०६, भांगे श्रेयश २०६, पानबुडे रिया २०४, मुकने अनघा २००, खडके अभ्युदय १९०, देशमुख स्नेहा १८६, महाडिक दिव्या १८४, खोटे अनन्या १८०, कुटे पल्लवी १८०, मगर प्रतीक्षा १७८, भानवसे ओंकार १७६, पवार संस्कृती १७६, दळवी उत्कर्षा १७६, कापरे अभिजीत १७२, मस्के प्रणाली १७२, नाळे समर्थ १७२, महाडिक सेजल १७०, गोरे ईश्वरी १६८, सुरवसे एकता १६६, शेळके ओंकार १६४, ढवळे सार्थक १६४, दळवी श्रेया १६४, सटाले स्वरूप १६४, आर राकेश के रमेश १६२, सोनवणे संस्कृती १६२ शिंदे वैष्णव १६२, हावळे संस्कृती १६०, खुळे अक्षरा १५८, गुजरे अर्णव १५८, येवले प्रणाली १५८, जाधव संग्राम १५६, देवकर शिवम १५४, कदम सानिका १४६, डरंगे स्वरा १४६, शिंदे वीर १४४, भानवसे सिद्धी १४२, गोंदील शिवतेज १४०, महाडिक सोहम १३६, घाडगे अद्विता, लोकरे नंदिनी १२६, ढोबळे साई १२४ असे गुण प्राप्त झाले आहेत.
                तसेच इयत्ता चौथी (प्राथमिक शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांमध्ये स्वरा जाधव २५८ (शाळेत प्रथम), अन्वित क्षीरसागर २४२, समृद्धी ननवरे २४२, श्रद्धा काळे २३८, वंश ढवळे २३६, शर्वरी तोडकर २१८, विराज सावंत २००, आनम पठाण १९६, स्वरांजली बंडगर १८८, संकेत कोकाटे १८४, अनुराधा पाटील – १८२, संस्कृती ढगे १८०, ज्ञानेश घुले १७४, राजवीर खराडे १७०, विश्वनाथ काशेट्टी १६४, श्रेयश लोभे १६२, यशराज कदम १६२, ईश्वरी जगताप १५६, शिवतेज काळे १५६, मयुरी केचे १५४, राजवीर बरबडे १५४, करण इरळकर १४२, आदित्य शिंदे १४०, राजवीर कोळपे १४०,ऋषिकेश नाळे १२८ असे गुण प्राप्त झाले आहेत.
                विद्यार्थ्यांच्या या उत्कृष्ट यशाबद्दल विद्यार्थ्यांना सचिन जाधव सर, प्रतीक कुटे , रेखा डोके , मीनल कुटे , काजल सावंत , सुगंधा भांगे , सुषमा कोरे आणि सोनाली भोसले मॅडम या शिक्षकांचे विशेष मार्गदर्शन, सहकार्य व अथक परिश्रम लाभले.
                विद्यार्थ्यांच्या या उत्तुंग यशाबद्दल  आमदार मा. अभिजीत (आबा) पाटील, सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन मा. श्री. रणजीत भैय्या बबनरावजी शिंदे, ज्ञानदीप शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नारायण भानवसे, विद्यालयाचे प्राचार्य विजय यादव, मुख्याध्यापक शोएब बागवान, शिक्षक-पालक संघ, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages