राजराजेश्वरी प्राथमिक शाळेत पालक सभा उत्साहात
सोलापूर (कटूसत्य वृत्त): विनायक नगर येथील राजराजेश्वरी बालक मंदिर प्राथमिक शाळेत पालक शिक्षक सभा पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका वैशाली कुंभार होते.प्रमुख अतिथी माता पालक संघाच्या सदस्या प्रेमा उपासे, इराबत्ती चारी,पालक शिक्षक संघाचे सदस्य शिवहर गाढवे आदी मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी हणमंत कुरे, लक्ष्मण कांबळे, मल्लिकार्जुन बिराजदार, वैशाली गुजर, उज्वला भांड आदी शिक्षकांनी शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती सांगितले. मुख्याध्यापिका वैशाली कुंभार म्हणाले,विद्यार्थी हेच आमचे दैवत आहेत. विद्यार्थी केंद्र बिंदू मानून अध्यापन केली जाते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास होण्यासाठी सर्व शिक्षक मनापासून प्रयत्न करतात. शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्तेत दिवसेंदिवस सुधारणा होत आहे. पालकांनी वेळोवेळी शिक्षकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.पालकांच्या शंकेचे निरसन केले. पालक समाधान व्यक्त केले. सभेचे सूत्रसंचालन सुजाता फुलारी यांनी केले तर शीतल चमके यांनी आभार मानले. सभा यशस्वी होण्यासाठी विशाल खाडे, अमोल गुड्डेवाडी, बजरंग शिरसाट,रविकांत पोतदार, किरण साळुंखे, महेंद्र वाघमारे, शारदा गिनानी, गौरी रेके, शिवगंगा दिवटे, वंदना तेली, राजश्री जवळकोटे आदींनी परिश्रम घेतले.

No comments:
Post a Comment