प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त नातेपुते महाविद्यालयात वृक्षारोपण
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त नातेपुते येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालयात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.साळुंखे यांच्या हस्ते प्रतिमापूजन व वृक्षारोपण करण्यात करण्यात आले. यावेळी कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. जगदीशचंद्र मुळीक,प्रा.उत्तम सावंत, प्रा.डॉ.बी.टी.निकम,प्रा.डॉ.सुनि ता सूर्यवंशी,प्रा.डॉ.डी. जी.शहाणे,प्रा.एस.एच. पवार ,
प्रा.डॉ.संभाजी बनसोडे,प्रा.अजित भोपळे, प्रा.बापूराव वाघमोडे, प्रा.अनिल घेमाड,ओएस हनुमंत वाघमोडे, नागराज करपे उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.साळुंखे यांनी प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या जीवन चरित्र विषयी माहिती सांगून वाढत्या प्रदूषणामुळे आणि हवामानातील बदलांमुळे मानवी अस्तित्व धोक्यात आले असून शुद्ध हवा मुबलक पाणी आणि जमिनीची धूप थांबवण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज बनली आहे. फक्त झाडे लावणे पुरेसे नाही, तर त्यांचे जतन आणि संगोपन करणे तितकेच आवश्यक आहे. आज ग्लोबल वॉर्मिंग (जागतिक तापमानवाढ) मुळे संपूर्ण पृथ्वी धोक्यात आली आहे. अशा वेळी जर आपण झाडे जगवली नाहीत, तर भविष्यात पिण्याच्या पाण्याची आणि शुद्ध हवेची मोठी टंचाई निर्माण होईल असे मत वृक्षारोपण करतेवेळी व्यक्त केले. यावेळी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी, पालक,विद्यार्थी- विद्यार्थिनी,व स्वयंसेवक उपस्थित होते.
.jpg)
No comments:
Post a Comment