आयुक्तांकडून प्रभाग क्र. १५ मधील भाजी मार्केट व नालेसफाईची प्रत्यक्ष पाहणी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- प्रभाग क्रमांक १५ च्या नगरसेविका श्रीमती श्रीदेवी जॉन फुलारे यांच्या निवेदनच्या अनुषंगाने आज सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी आज रेल्वे लाईन परिसरातील भाजी मार्केट, नाल्याची स्वच्छता व रामवाडी येथील गजानन महाराज पालखी मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित विभागांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.या पाहणी या प्रसंगी नगरसेवक विनोद भोसले,नागेश खरात,विजय कदम,नगर अभियंता (प्रमुख) सारिका आकुलवार, विभागीय अधिकारी विजय लोखंडे,सफाई अधीक्षक अनिल चराटे, तसेच महानगरपालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.पाहणीदरम्यान भाजी मार्केट परिसरात साचलेला कचरा, दुर्गंधी, अपुरी स्वच्छता व्यवस्था तसेच महिला विक्रेत्यांसाठी स्वतंत्र शौचालय नसल्याची बाब निदर्शनास आली. तसेच मंडईलगतच्या नाल्याच्या संरक्षण भिंतीचे अनेक ठिकाणी नुकसान झाल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याचेही स्पष्ट झाले.
याची गंभीर दखल घेत आयुक्तांनी संपूर्ण भाजी मार्केट परिसर तातडीने स्वच्छ करून दुर्गंधीमुक्त करण्याचे आदेश दिले. नियमित स्वच्छता, निर्जंतुकीकरण आणि प्रभावी कचरा व्यवस्थापन राबविण्याबरोबरच नाल्यालगत मजबूत संरक्षण भिंत उभारण्याची कार्यवाही त्वरित सुरू करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच दंडवत महाराज मठ जवळील नालाच्या बाजूला लोकवस्ती असल्याने मोठ्या प्रमाणावर कचरा टाकण्यात येण्याचे प्रकार आयुक्तांच्या निदर्शनास आणले या वर आयुक्तांनी पुलाच्या दोन्ही बाजूस जाळी अथवा संरक्षक भिंत उभी करण्यात येईल असे स्पष्ट केले जेणे करुन कोणीही कचरा टाकता येणार नाही
यानंतर रामवाडी येथील गजानन महाराज पालखी मार्गावरील जुन्या बंद असलेल्या पोलीस ठाण्याची संरक्षक भिंत अत्यंत जीर्ण व धोकादायक अवस्थेत असल्याचे पाहणीदरम्यान आढळून आले. आगामी गजानन महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर हजारो भाविक या मार्गाने जाणार असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी संबंधित विभागाने तातडीने भिंतीची दुरुस्ती करावी. दुरुस्तीला विलंब झाल्यास सुरक्षेच्या दृष्टीने भिंतीसमोर बॅरिकेड्स उभारून आवश्यक खबरदारी घ्यावी, असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी दिले.
भाजी मार्केटमधील महिला विक्रेत्यांच्या अडचणी लक्षात घेऊन स्वतंत्र शौचालयासह आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही सकारात्मक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यानंतर मनपाची शाळा क्र 25 येथे आज आयुक्तांनी भेट दिली त्या वेळी शाळेतील शैक्षणिक व्यवस्थेची गुणवत्ता पहिली तसेच विद्यार्थ्यांची छोटीसी चाचणी आयुक्तांनी घेतली या वेळी शाळेला शासनाकडून मिळालेली सर्व साहित्य शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात यावे तसेच शाळेच्या शेजारील मैदान घाण राहता कामानये असे आदेश देण्यात आले.या भेटी दरम्यान प्रशासन अधिकारी मल्हारी माने तसेच शाळेचे मुख्याध्यापक तसेच नगरसेविका श्रीदेवी फुलारे नगर अभियंता कडून सारिका आकुलवार विभागीय अधिकारी विजय लोखंडे तसेच इतर प्रशालेचे शिक्षक वर व कर्मचारी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment