घोटी येथे सराफ दुकान फोडून २ लाख ४४ हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, July 10, 2026

घोटी येथे सराफ दुकान फोडून २ लाख ४४ हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास

 घोटी येथे सराफ दुकान फोडून २ लाख ४४ हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास




टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- माढा तालुक्यातील घोटी येथील ग्रामपंचायतीच्या गाळ्यात असलेल्या सराफ दुकानाचे कुलूप तोडून व शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी तब्बल २ लाख ४४ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३३१(४) व ३०५(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शशिकांत शंकर जाधव (वय २८, व्यवसाय – सराफ, रा. घोटी, ता. माढा, जि. सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचे ग्रामपंचायतीच्या गाळ्यातील सराफ दुकान दि. ८ जुलै २०२६ रोजी रात्री ८.०० ते दि. ९ जुलै २०२६ रोजी सकाळी ८.३० या कालावधीत बंद असताना अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडून व शटर उचकटून आत प्रवेश केला.
चोरट्यांनी दुकानातील विविध प्रकारचे सोन्याचे कुंडल, तारबाळी, टॉप्स, मोरणी, लटकन, सोन्याचे मणी तसेच चांदीच्या जोडव्या, अंगठ्या व पैंजण असा एकूण २ लाख ४४ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
चोरीस गेलेल्या मालामध्ये ६ सोन्याचे कुंडल, एक तारबाळी, तीन ग्रॅम वजनाच्या टॉप्सची जोडी, विविध वजनांच्या ४० सोन्याच्या मोरण्या, १.५ ग्रॅमचे लटकन, ४० सोन्याचे मणी, मोडीसाठी आलेले सोन्याचे मणी व मोरणी तसेच ३५ भार वजनाचे चांदीचे दागिने यांचा समावेश आहे.
या प्रकरणी दि. ९ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६.३९ वाजता टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अद्याप चोरीस गेलेला माल हस्तगत झालेला नाही.
या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश बावकर करीत असून, गुन्ह्याची नोंद पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष घोगरे यांनी केली आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्याचे काम पोलीस करीत आहेत.

*चौकट*
#########################
 ( सध्या टेंभुर्णी परिसरात चोरीचे प्रमाणात वाढ झाली असून टेंभुर्णी एसटी बस स्थानकातून एका महिलेचे अज्ञान चोरट्याने सोन्याचे दागिने लंपास केले आहे तसेच सापटणे टें येथून एका शेतकऱ्याच्या शेतातून चोरट्यानी शेळ्या पळवून नेले आहेत तसेच करमाळा चौकातील एक मोटरसायकल अज्ञान चोरट्याने घरासमोरून घेऊन पसार झाला आहे तर आज टेंभुर्णी  पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घोटी येथील अज्ञान चोरट्यानी सराफांच्या दुकानाचे शटर उचलून  सोन्याचे वेगवेगळे डागीन्याचा  ऐवज लंपास केला आहे वरील घटनेचा अद्याप एक हि तपास झाला नसून याकडे टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे दुर्लक्ष झाले  काय ? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकातून होत आहे तरी नवीन टेंभुर्णी पोलीस ठाणे हजर झालेली बाळासाहेब भरणे यांनी तातडीने लक्ष देऊन अवैध धंद्याबरोबरच चोरट्यांचाही आळा बसवण्याची नागरिकातून मागणी होत आहे )

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages