माऊली पालखी सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज, रविवारी सोलापूर जिल्ह्यात आगमन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, July 20, 2026

माऊली पालखी सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज, रविवारी सोलापूर जिल्ह्यात आगमन

 माऊली पालखी सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज, रविवारी सोलापूर जिल्ह्यात आगमन

 



नातेपुते (कटूसत्य वृत्त):- श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचा सोलापूर जिल्ह्यात रविवार दिनांक 19 जुलै रोजी प्रवेश होणार असून स्वागतासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे सह अनेक मंत्री आमदार जिल्हाधिकारी यांच्यासह अनेक प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत सोलापूर जिल्ह्यातील पहिला मुक्काम नातेपुते येथे होणार आहे त्या अनुषंगाने प्रशासन व नगरपंचायत यांनी पालखीतळावरील वारकऱ्यांसाठी लागणाऱ्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले आहे पालखी मार्गावरील साफसफाई रस्त्याच्या कडेला वाढलेली झाडे व फांद्या हटवणे अतिक्रमण निर्मूलन मोहीम तसेच पालखीतळाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती आणि सपाटीकरणाची कामे सर्व पूर्ण झाली आहेत यावेळी नातेपुते नगरपंचायत चे उपनगराध्यक्ष अतुल पाटील यांनी सांगितले की पालखी तळावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 24 तास वॉच टॉवरची त्या ठिकाणी उभारणी केली आहे तसेच सीसीटीव्ही कॅमेरे द्वारे व एआय तंत्रज्ञानाच्या साह्याने गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्या ठिकाणी निरीक्षण केले जाणार असल्याचेही उपनगराध्यक्ष अतुल पाटील यांनी सांगितले. मुख्याधिकारी विकास शिंगाडे माहिती देत असताना म्हणाले की, पालखी सोहळा संदर्भात सर्व तयारी झाली असून वारकऱ्यांना सर्व सुविधा पुरवण्याच्या दृष्टीने आरोग्य कक्ष, स्नानगृह, वारकऱ्यांसाठी पिण्याचे टँकर भरण्याच्या सुविधाच, विविध ठिकाणी जाण्यासाठी दिशा फलक, ठीक ठिकाणी मोबाईल टॉयलेट अशा अनेक सुविधाचे नियोजन केले आहे. तसेच पालखी सोहळा पालखी मैदानाकडे जात असताना भव्य अशी आकर्षक स्वागत कमान त्या ठिकाणी करण्यात आली असल्याचे शिंगाडे यांनी सांगितले.

चौकटीत :
पालखी सोहळ्या करिता एकूण १४ शे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा बंदोबस्त यामध्ये
१ पोलीस अधीक्षक २ अप्पर पोलिस अधीक्षक
६ उपविभागीय पोलिस अधिकारी १३ पोलीस निरीक्षक ४५ सपोनी/ पोलीस उपनिरीक्षक ५५६ पोलीस पुरुष पोलिस अंमलदार ९७ महिला पोलिस अंमलदार ३४७ पुरुष होमगार्ड ५३ महिला होमगार्ड
२ एस.आर.पी. एफ कंपनी २ बॉम्ब शोधक पथक
२ क्यू आर टी टीम १ आर सी पी पथक असा बंदोबस्त पालखी सोहळ्यासाठी असणार आहे ठिकठिकाणी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही  व एआय द्वारे नियंत्रण ठेवले जाणार आहे वॉटर फिलिंग पॉईंट सोहळा मार्ग पालखी क्रॉसिंग पॉइंट तसेच सोलापूर जिल्हा सरहद्द स्वागताच्या ठिकाणी धर्मपुरी विसावा या ठिकाणी मोरूची विसावा या ठिकाणी तसेच नातेपुते पालखीतळ या ठिकाणी व पालखी रतासोबत पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे पोलीस प्रशासनाकडून सर्व ठिकाणी ची पाहणी करून ज्या ठिकाणी आवश्यक असेल त्या ठिकाणी पोलीस कर्मचारी देऊन बंदोबस्त लावण्यात आला आहे पोलीस प्रशासनाकडून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या बंदोबस्ताचे सर्व नियोजन झाले आहे.
विशाल वायकर 
सहाय्यक पोलीस निरीक्षक नातेपुते पोलीस ठाणे

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages