सिंहगड पब्लिक स्कूल कोर्टी , पंढरपूर शाळेमध्ये विद्यार्थी प्रतिनिधी पदग्रहण सोहळा संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, July 4, 2026

सिंहगड पब्लिक स्कूल कोर्टी , पंढरपूर शाळेमध्ये विद्यार्थी प्रतिनिधी पदग्रहण सोहळा संपन्न

 सिंहगड पब्लिक स्कूल कोर्टी , पंढरपूर शाळेमध्ये विद्यार्थी प्रतिनिधी पदग्रहण सोहळा संपन्न




सिंहगड पब्लिक स्कूल कोर्टी  शाळेतील विद्यार्थी प्रतिनिधी व हाऊस प्रतिनिधी यांचा पदग्रहण सोहळा आयोजित करण्यात आला होता.
   या कार्यक्रमाची सुरवात विद्येची देवता सरस्वती पूजन पालक सौ स्वाती गुंगे, प्राचार्या स्मिता नवले, मुख्याध्यापिका स्मिता नायर आदींच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गायन करून मान्यवरांचे व पालांकाचे स्वागत केले. यानंतर मुलांना शाळेतील शिक्षकांच्या हस्ते बॅचेस प्रदान करण्यात आले व शिस्ती संदर्भात शपथ देण्यात आली.
     विद्यार्थी प्रतिनिधी निवडण्यासाठी लोकशाही पद्धतीने दिनांक 12 जून 26 रोजी मतदान घेण्यात आले होते. त्या नुसार विद्यार्थी प्रतिनिधी एक मुलगा व मुलगी, शिस्त प्रमुख, सांस्कृतिक प्रमुख व क्रीडा प्रमुख यांची निवड करण्यात आली तसेच हाऊस प्रमुख व शिस्त सांभाळण्यासाठी विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
या वेळी उपक्रमशील प्राचार्या स्मिता नवले यांनी शाळेत चालणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती दिली व विद्यार्थ्यांना शिस्तीचे पालन करण्यास सांगून शुभेच्छा दिल्या. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका स्मिता नायर यांनी शाळेच्या शिस्तीबद्दल माहिती दिली.
   हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिंहगड पब्लिक स्कूल पंढरपूर मधील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. 
  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रुती व्यवहारे व मधुसूदन डोंगरे या विद्यार्थ्यांनी केले तर उपस्थितांचे आभार हृदयनाथ नामदे सर यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages