आषाढी यात्रा 2026: जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी केली पालखी मार्ग, तळांची पाहणी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, July 17, 2026

आषाढी यात्रा 2026: जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी केली पालखी मार्ग, तळांची पाहणी

आषाढी यात्रा 2026जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी केली पालखी मार्ग, तळांची पाहणी 



            

          पंढरपूर  (कटूसत्य वृत्त):- संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे 19 व जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 20 जुलै रोजी जिल्ह्यात आगमन होणार आहे. तसेच अन्य संतांच्या पालखी सोहळे देखील जिल्ह्यात प्रवेश करणार आहेत. या पालखी सोहळ्यासोबत लाखोंच्या संख्येने वारकरी भाविकांची गर्दी असते.येणाऱ्या वारकरी भाविकांना पालखी मार्गावर तसेच मुक्कामाच्या ठिकाणी प्रशासनाकडून आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतात. सदर सुविधा बाबतची पाहणी आज जिल्हाधिकारी एस.कार्तिकेयन यांनी केली.

 

         आषाढी यात्रा पालखी सोहळा  निर्विघ्न व सुखकरपणे पार पाडावा यासाठी शासनाकडून वारकरी भाविकांच्या सोयी सुविधेसाठी तसेच पालखी तळांच्या विकासासाठी मुबलक निधीची उपलब्धता करण्यात आली आहे. वारकरी भाविकांना पालखी तळावर पायाभूत सुविधेसह अधिकच्या सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात. तसेच पालखी तळावर व मार्गावर कोणत्याही अडचणी निर्माण होऊ नयेत याची आवश्यक दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी एस कार्तीकेयन यांनी दिल्या.

       

         भंडीशेगाव येथे सोपान काका पालखी तळाच्या विकासासाठी शासनाकडून 54 लाख रुपये निधी देण्यात आला असूनजलसंपदा विभागाच्या वापरात नसलेल्या इमारती पाडून सपाटीकरण व मुरमीकरण करण्यात येत आहे तसेच पालखी कट्ट्याचे कामहायमास्ट दिवे आदी कामे प्रगतीपथावर असून, सदर कामे दर्जेदार करुन,पालखी सोहळा दाखल होण्याच्या आगोदर  पुर्ण करावित.  तसेच पालखीतळाच्या कट्ट्या शेजारील जुनी इमारत पाडण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी.  वाखरी येथील पुला शेजारी मुरमीकरण करून उतार करावावाखरी पालखी  शेजारी तात्पुरती ड्रेनेज करून घ्यावे जेणेकरून पाणी साठणार नाहीयाची दक्षता घ्यावी. पालखी सोहळे जिल्ह्यात दाखल होण्याच्या अगोदर सर्व कामे पूर्ण करावीत अशा सूचना जिल्हाधिकारी एस कार्तिकेत यांनी दिल्या.

 

         यावेळी त्यांनी सरगम चौक वाखरी पूल-वाखरी पालखी तळ,  भंडीशेगाव येथील सोपान काका महाराज पालखीतळ, ज्ञानेश्वर महाराज पालखी तळगुरसाळेकरकंब  येथील पालखी तळाची व मुक्कामाच्या ठिकाणची पाहणी केली. याप्रसंगी त्यांच्या समवेत प्रांताधिकारी सचिन इथापेकार्यकारी अभियंता अमित निमकरतहसीलदार सचिन लंगुटेगटविकास अधिकारी अमोल जाधवराष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अभिजीत औटीउपस्थित होते.

   

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages