श्री.संत गजानन महाराज पालखी मार्गावर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, July 17, 2026

श्री.संत गजानन महाराज पालखी मार्गावर

 श्री.संत गजानन महाराज पालखी मार्गावर  

जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते वृक्षारोपण

                                       कामती व मंगळवेढा पोलीस ठाणे हद्दीत वृक्षारोपणास प्रारंभ

                                                                         रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी जनजागृती



           

          पंढरपूर  (कटूसत्य वृत्त):- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हरीतवारी  संकल्पनेतुन श्री. संत गजानन महाराज पालखी मार्गावर जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते  कामती व मंगळवेढा पोलीस ठाणे हद्दीत वृक्षारोपणाचा  प्रारंभ करण्यात आला तसेच रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी व जनजागृती करण्यासाठी अपघात झालेल्या वाहनाची प्रतिकृती रस्त्यालगत लावून जनजागृती करण्यात आली.

                                            

          मंगळवेढा येथे हरितक्रांतीची वारी हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला तसेच सोलापूर जिल्ह्यात वाढत्या रस्ते अपघाताच्या पार्शवभूमीवर  जनजागृती करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी  उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे, पोलीस निरीक्षक बसवेश्वर जकिकोरे, दत्तात्रय बोरिगिड्डे, प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी वर्गमाहामार्ग प्राधिकरणाचेअधिकारीबालाजी अमाईन्सचे समन्वय अधिकारी अनिल विप तसेच शिक्षकवृंद, एन सी सी चे विदयार्थीशिक्षकमाजी सैनिक, वृक्ष प्रेमी नागरीक व पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.       

 

        यावेळी जिल्हा पोलीस  अधीक्षक अतुल कुलकर्णी म्हणाले,  रस्त्यावर होणाऱ्या अपघातांमध्ये बरेच  मृत्यू हे हेल्मेट न घातल्यामुळे होतात. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही कायद्याची कडक अंमलबजावणी होण्याआधीच स्वसुरक्षेसाठी हेल्मेटचा वापर करावा. हेल्मेट हा दंड टाळण्यासाठी नव्हे तर जीव वाचवण्यासाठी आहे. तसेच प्रत्येकाने एक झाड लावून त्याचे संगोपन करावे व जास्तीत जास्त सेंद्रिय शेतीचा वापर करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

 

           आषाढी वारीचे सांस्कृतिक दर्शन घडवीत हरितक्रांतीची वारी हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला विद्यार्थिनी वारकरी यांच्या वेशात पर्यावरण संवर्धनवृक्ष लागवड पाणी संवर्धन व सेंद्रिय शेतीचा संदेश देत जनजागृती केली तसेच  रस्त्याचे दुतर्फा वृक्ष लागवडीचा संकल्प करुन वडपिंपळकडू लिंबइत्यादी वृक्षांची लागवड करण्यात आली. हेल्मेट न घातल्यामुळे झालेल्या भीषण अपघाताचे प्रतीक म्हणून तयार करण्यात आलेला दुचाकी अपघाताचा देखावा.हेल्मेट चे महत्व वाहतूक नियमांचे पालन आणि सुरक्षित वाहन चालवण्याबाबतचा संदेश देणारे माहिती फलक लावण्यात आले. अपघातग्रस्त चारचाकी वाहनाचा डीस्प्ले आणि त्यासोबत वाहतुकीच्या नियमांचे फलक देखील उभारण्यात आले.

 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages