नातेपुते नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरोधात सर्व नगरसेवक आक्रमक
नातेपुते(कटूसत्य वृत्त):- नातेपुते ग्रामपंचायतचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाल्यानंतर सुरळीत कारभार सुरू होता परंतु यावर्षी मात्र या कामकाजाविषयी प्रचंड नाराजी दिसत असून चक्क नगरसेवकांना विश्वासात न घेता मुख्याधिकारी विकास शिंगाडे नातेपुते नगरपंचायत चे कामकाज करत असून नगरसेवक नगरपंचायत कामाविषयी अनभिज्ञ आहेत. नातेपुतेतील जनतेत मात्र या लोकप्रतिनिधी नगरसेवकाबाबतच गैरसमज निर्माण होत आहे.नागरिकांनी गैरसमज करुन न घेता घरपट्टी,पाणी यासही अनेक विविध जनतेचे प्रश्न आहेत त्या जनतेच्या प्रश्नासाठी नगरसेवक रस्त्यावर उतरतील असे प्रतिपादन माजी उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख यांनी दिला.
नातेपुते नगरपंचायतच्या कार्यालयात नातेपुते नगरपंचायतच्या सर्व नगरसेवकांची बैठक बोलवून पत्रकार परिषद घेत या नगरपंचायच्या सर्व कामाचा लेखाजोखा मांडला. यावेळी सर्व नगरसेवकांमध्ये जनतेची तळमळ पाहायला मिळाली. विकास कामासाठी नातेपुते नगरपंचायत चे मुख्याधिकारी विकास शिंगाडे यांना सर्व नगरसेवकांनी धारेवर धरले.
याबाबत माहिती देताना माजी उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख म्हणाले, नवीन कर आकारणीचा विषय नगरपंचायत च्या मिटिंग मध्ये आला होता तो कर आकारणीचा ठराव सर्व नगरसेवकांनी एकमताने नामंजूर केला होता. सर्व नागरिकांना विश्वासात घेऊनच कर आकारणी करावे असे सांगण्यात आले होते परंतु या ठरावाला बगल देत नातेपुते नगरपंचायतचे मुख्याधिकारी विकास शिंगाडे यांनी करआकारणीच्या पावत्या नातेपुते गावांमध्ये वाटप करायला लावल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे.नातेपुते नगरपंचायतचा कारभार करताना नगरसेवकांना विश्वासात घेतले जात नाही. नगरसेवकांनी संत ज्ञानेश्वर महाराज पालखीसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे व माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्याकडून ५५ लाख रूपयांचा निधी मंजूर करून आणला परंतु मुख्य अधिकारी विकास शिंगाडे यांच्या मनमानी कारभारामुळे आलेल्या निधीचा योग्य ठिकाणी वापर होत नसून गावात मुरुम टाकतानाही मनमानी पहायला मिळत आहेत.यावेळी अधिकाऱ्यांना बोलवुन कामाच्या आढावा घेतला कामात कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली.२५ लाख रु बांधकाम खात्याला तर ३० लाख नातेपुते नगरपंचायतला आले असुन या कामात कोठेही नगरसेवकाला विश्वासात घेतले जात नाही.सदरची कामे कोणत्या ठेकेदारामार्फत होतात. कुठल्या प्रभागात होतात हेही नघरसेवकांना माहिती होत नसून जिल्हाधिकारी यांचा दौरा सुध्दा नगरसेवकांना माहिती होत नाही.नगरसेवकांना विश्वासात घेऊनच पालखी सोहळा व्यवस्थित पार पाडावा तसेच ग्रामस्थाना विश्वासात घेऊनच विकास कामे व्हावीत.
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती बोलत असताना म्हणाले की मुख्याधिकारी अनेकदा १५ - १५ दिवस लोकप्रतिनिधीशी संपर्क साधत नाहीत फोन केल्यानंतर फोन उचलत नाहीत त्यामुळे नागरिकांच्या समस्या प्रलंबित राहत असून प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वयाचा अभाव निर्माण झाला आहे. यावेळी पत्रकार परिषदेस मुख्याधिकारी विकास शिंगाडे, नगराध्यक्षा अनिता लांडगे, उपनगराध्यक्ष अतुल पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, माजी नगराध्यक्षा उत्कर्षा राणी पलंगे,माजी उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख, अण्णा पांढरे, रावसाहेब पांढरे, बांधकाम सभापती सुरेंद्र सोरटे, अतुल बावकर, अविनाश दोशी, रणवीर देशमुख, दादा उराडे, , माया उराडे, सांगिता काळे, नातेपुते पोलीस ठाण्याचे सपोनि विशाल वायकर तसेच नगरपंचायतीचे अधिकारी उपस्थित होते.
------------------------------ ------------------------------ ---
नविन कर आकारणीसाठी सर्व नगरसेवकांचा विरोध असताना व त्या संदर्भात चा ठराव रद्द केला असताना तरी सुध्दा मुख्याधिकारी यांनी ऐकले नाही. मुख्याधिकाऱ्यांनी नातेपुते शहरात डिमांडचे वाटप . करण्यास सांगितले यामुळे नागरिकात तिव्र नाराजी आहे.नगरसेवकांनी सांगुनही मुख्याधिकारी ऐकत नाहीत. त्यामुळे सर्व नगरसेवक कर आकारणी विरोधात रस्त्यावर उतरून नागरिकांचे प्रश्न सोडविणार आहेत.
मालोजीराजे देशमुख
माजी उपनगराध्यक्ष
------------------------------ ------------------------------ ---
पालखी येण्यापूर्वी नातेपुते गावात विजेची कामे सुरु असतात.त्यामुळे पिण्याच्या पाण्याची नागरिकांची गैरसोयीचे होते.जनरेटरची सोय करण्यास मुख्याधिकारी यांना सुचविले होते.परंतु कार्यवाही झाली नाही. प्रसंगी पाण्याची गैरसोय झाली असून विस्कळीत झालेला पाणीपुरवठा पूर्वपदावर आणण्यासाठी संबंधित विभागांना सूचना दिल्या.
भारतीताई पांढरे
सभापती पाणीपुरवठा नगरपंचायत नातेपुते

No comments:
Post a Comment