जिल्हाधिकारी यांनी केली दर्शन रांग व पत्राशेडची पाहणी
* स्वेरी कॉलेज ते विठ्ठल-रुक्मिणी मंदीरा पर्यंत चालत केली पाहणी: दर्शन रांगेतील भाविकांशी साधला संवाद
* व्हीआयपी दर्शन नोंदणी वहीची केली तपासणी
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- आषाढी शुद्ध एकादशी 25 जुलै 2026 रोजी असून, श्री विठ्ठल रुक्मिणीच्या पदस्पर्श दर्शनासाठी भाविकांची पंढरपुरात मोठी गर्दी होत आहे. दर्शन रांगेतील भाविकांना सुलभ व जलद दर्शन व्हावे यासाठी आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमिवर श्री विठ्ठल रूक्मिणीचे व्हिआयपी दर्शनाबाबत आपत्ती व्यवस्थापन कायद्यातंर्गत तसेच राज्य शासनाच्या निर्णयानुसार जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी व्हीआयपी दर्शन बंदचे आदेश दिले आहेत. सदर आदेशाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होते का नाही याची पाहणी जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी आज पाहणी केली.
जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी स्वेरी कॉलेज ते श्री विठ्ठल रुक्मिणी मंदीरापर्यंत चालत पाहणी केली. यावेळी मंदीर समितीकडून दर्शन रांग, पत्राशेड येथे भविकांच्या सुविधेसाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेची पाहणी केली. यामध्ये पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय, आरोग्य, मॅट, सीसीटीव्ही, आपत्ती व्यवस्थापन कक्ष आदी बाबतची पाहणी केली. तसेच दर्शन रांगेतील भाविकांशी संवाद साधून उपलब्ध सुविधा व दर्शनव्यवस्था याबाबत माहिती घेतली. यावेळी दर्शन रांगेतील भाविकांना सुलभ व जलद दर्शन मिळावे यासाठी समितीने दर्शन रांगेत घुसखोरी होणार नाही याची दक्षता घेवून आवश्यक सुरक्षा रक्षक नेमावेत. गोपाळपूर येथील पुलाची पाहणी करुन सुरक्षेच्या दृष्टीने तात्काळ दुरुस्ती करावी. गोपाळपूर ते स्वेरी कॉलेज येथील दर्शनरांगेत प्रखर प्रकाश व्यवस्था करावी अशा सूचना दिल्या. तसेच मंदीरातील सीसीटीव्ही कक्षाला भेट देवून व्हीआयपी नोंदणी रजिस्टरची तपासणी देखील जिल्हाधिकारी यांनी केली.
वाखरी पालखी तळावर साठलेलं पाण्याचा निचरा होण्यासाठी पूर्वी टाकलेल्या पाईपचा व्यास कमी असल्यामुळे आता नव्याने मोठ्या व्यासाच्या पाईप त्या ठिकाणी टाकल्या जातील ज्यामुळे उताराने पाणी निघून जाईल आणि पालखीतळावर पाणी साठणार नाही अशी योजना केली आहे. याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व नगरपालिका प्रशासनास आवश्यक सुचना दिल्या त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी त्यांच्या समवेत प्रातांधिकारी सचिन इथापे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, कार्यकारी अभियंता अमित निमकर, तहसिलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी महेश रोकडे, व्यवस्थापक प्रविणकुमार घम यांच्यासह संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते
%20(1).jpeg)
%20(1).jpeg)
No comments:
Post a Comment