सामाजिक न्याय विभागाकडून 20 गटई कामगारांना पत्र्याच्या स्टॉलचे वाटप - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, July 7, 2026

सामाजिक न्याय विभागाकडून 20 गटई कामगारांना पत्र्याच्या स्टॉलचे वाटप

 सामाजिक न्याय विभागाकडून 20 गटई कामगारांना पत्र्याच्या स्टॉलचे वाटप




 

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील कामगारांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाच्या गटई स्टॉल योजनेंतर्गत आज 20 पात्र लाभार्थ्यांना पत्र्याच्या स्टॉलचे वाटप करण्यात आले. आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह, सोलापूर येथे सहायक आयुक्त समाज कल्याण सुलोचना सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली व हस्ते हा कार्यक्रम पार पडला.

1977 पासून योजना कार्यान्वित-

गटई स्टॉल योजना 1977 पासून शासनाने अनुसूचित जातीतील चर्मकार, ढोर, होलार, मोची इत्यादी समाजातील लोकांसाठी सुरू केली आहे. महाराष्ट्रात चामड्याच्या वस्तू व पादत्राणे दुरुस्तीच्या व्यवसायात मोठ्या प्रमाणावर अनुसूचित जातीतील व्यक्ती कार्यरत आहेत. हे व्यावसायिक रस्त्याच्या कडेला उन्हातान्हात बसून सेवा देत असतात. त्यांना ऊन, वारा व पावसापासून संरक्षण मिळावे व आर्थिक उन्नती व्हावी यासाठी ग्रामपंचायत, नगरपालिका क्षेत्रात 100 टक्के सहायक अनुदानावर गटई स्टॉल देण्याची योजना राबविण्यात येते.

अनुदानाची रक्कम-

सदर योजनेंतर्गत प्रति गटई स्टॉलसाठी रु. 42,797.50 व चर्मोद्योग/पादत्राणे व्यवसायासाठी आवश्यक साहित्य खरेदीसाठी प्रति लाभार्थी रु. 5000 प्रमाणे 100 टक्के सहायक अनुदानावर लाभ दिला जातो. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये या योजनेसाठी एकूण रु. 9,80,000 इतके अनुदान कार्यालयाकडे प्राप्त झाले आहे.

या कार्यक्रमात सहायक आयुक्त समाज कल्याण, सोलापूर सुलोचना सोनवणे यांच्या हस्ते 20 लाभार्थी गटई कामगारांना स्टॉलचे वाटप करण्यात आले. यावेळी कार्यालय व वसतिगृहातील अधिकारी-कर्मचारी तसेच योजनेचे लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages