गुरुदेव दत्त भाग-1 मधील रस्त्यावरील दिव्यांची समस्या अखेर दूर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, July 16, 2026

गुरुदेव दत्त भाग-1 मधील रस्त्यावरील दिव्यांची समस्या अखेर दूर

 गुरुदेव दत्त भाग-1 मधील रस्त्यावरील दिव्यांची समस्या अखेर दूर

माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- प्रभाग क्रमांक २६ मधील गुरुदेव दत्त भाग-१ परिसरातील अनेक दिवसांपासून बंद असलेल्या रस्त्यावरील दिव्यांची समस्या अखेर दूर झाली आहे. माजी नगरसेविका सौ. राजश्री चव्हाण यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर महानगरपालिकेने तातडीने दुरुस्ती करून परिसरातील प्रकाश व्यवस्था पूर्ववत केली.

गुरुदेव दत्त मंदिर परिसरात भाविकांची नेहमीच वर्दळ असते. मात्र, रस्त्यावरील दिवे बंद असल्यामुळे नागरिकांसह भाविकांना रात्रीच्या वेळी मोठा त्रास सहन करावा लागत होता. स्थानिक नागरिक व मंदिराच्या पुजाऱ्यांनी झोन कार्यालय तसेच महापालिकेच्या लाईट विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही समस्या कायम होती.

ही बाब नागरिकांनी माजी नगरसेविका सौ. राजश्री चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे तसेच लाईट विभागाचे प्रमुख परदेशी यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यानंतर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसह देखभाल पथक घटनास्थळी दाखल होऊन बंद दिव्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात आली.

यावेळी स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त करताना सांगितले की, अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या मूलभूत सुविधांचे प्रश्न राजश्री चव्हाण यांच्या कार्यकाळात मार्गी लागले. परिसरात पाणीपुरवठा पाइपलाइन, ड्रेनेज व्यवस्था, अंतर्गत काँक्रीट रस्ते आणि आता रस्त्यावरील प्रकाश व्यवस्था अशा विविध विकासकामांमुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. नागरिकांच्या समस्यांवर तत्परतेने प्रतिसाद देत जनसेवा करणाऱ्या लोकप्रतिनिधींची प्रत्येक प्रभागाला गरज असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

यावेळी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कोरे, माळी, वीरेंद्र पुजारी, वाहतूक पोलीस हवालदार पाटील, मयूर पुजारी, बनसोडे, रेल्वे अधिकारी वलेकर, रेणुका पुजारी तसेच सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages