मुख्य कार्यकारी अधिकारी महाडदळकर कसबे तडवळे जि.प.शाळांना भेट
कसबे तडवळे (कटूसत्य वृत्त):- जिल्हा परिषद आदर्श केंद्रिय प्राथमिक शाळा कसबे तडवळे या ठिकाणी आज धाराशिव जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियवंदा महाडदळकर यांनी भेट दिली.अर्धवेळ शाळे दिवशी सकाळी साडेआठ वाजता त्यांनी शाळेला भेट दिली.शाळेतील भौतिक सुविधा माहिती घेऊन प्रत्यक्ष वर्गाला त्यांनी भेटी दिल्या. यामध्ये इयत्ता तिसरी, पाचवी, चौथी,पहिली,दुसरी,सहावी या वर्गांना भेटी देऊन प्रत्यक्ष विद्यार्थ्यांशी संवाद साधला.तिसरीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष पाठ्यपुस्तकातील वाचन घेतले.पाचवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना प्रथमतः इंग्रजी विषयाबाबत विचारून विद्यार्थ्यांना बोलते केले. तसेच वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याला मोठे झाल्यावर तू काय होणार असे प्रश्न विचारून त्यांची उत्तरे ऐकून समाधान व्यक्त केले.गणित विषयाच्या नवोदय स्पर्धा परीक्षेतील सरावाच्या वह्या प्रत्यक्ष पाहिल्या. इयत्ता चौथीच्या वर्गात भेट देऊन वर्गातील विद्यार्थी स्वतःबद्दल इंग्रजीमध्ये माहिती देणे हा उपक्रम घेतला.योग्य शब्द वाक्याची रचना कशी करायची हे विद्यार्थ्यांना स्वतःहून मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले. त्यानंतर इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी पंधरा दिवसात अक्षरांचे अवयव गिरवून शब्दांचे प्रकट वाचन सुरू केल्याबद्दल अभिनंदन केले.इयत्ता दुसरीच्या वर्गाला फळ्यावरील उतारा वाचायला सांगितला.तीन-चार मुलांना उतारा वाचण्यास सांगून इंग्रजीचे पुस्तकही दुसरीतील मुले वाचतात याबद्दल समाधान व्यक्त केले.पहिली अ वर्गाला भेट देऊन मुळाक्षरांचे वाचन घेतले. इयत्ता दुसरी ब च्या वर्गात मुलांना विविध प्रश्न विचारून सी.ई.ओ.मॅडमनी बालकांचे भविष्य समजून घेण्याचा प्रयत्न केला.शाळा व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियवंदा महाडदळकर यांचा सत्कार मिरॅकल हे पुस्तक देऊन शाळा व्य स अध्यक्ष विजय पवार, सदस्य राहुल नाईकनवरे मुख्याध्यापक केशव पवार यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी पाचवी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना मन मे है विश्वास हे पुस्तक भेट देऊन त्यांच्या अभिनंदन केले. तसेच डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकास भेट देऊन माहिती घेतली.शाळेच्या भौतिक सुविधांचा आढावा घेताना दोन नादुरुस्त खोल्यांच्या निर्लेखनाबाबत शालेय समिती व मुख्याध्यापकांकडून माहिती घेतली.भेटीदरम्यान शाळा समितीचे अध्यक्ष पवार, मुख्याध्यापक केशव पवार, सदस्य राहुल नाईकनवरे, भागवत शिंदे,सुहास सावंत,तेजस भालेराव,पवन करंजकर,नानासाहेब पवार,भारत लोंढे, माजी अध्यक्ष अमोल पवार,कन्या शाळा माजी अध्यक्ष सोमनाथ भोसले ,राजेंद्र करंजकर,प्रशांत सदावर्ते,बाळासाहेब करंजकर व शिक्षण प्रेमी नागरिक उपस्थित होते.

No comments:
Post a Comment