अनंत चैतन्य प्रशालेत नवागतांचे उत्साहात स्वागत
अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- 15 जून पासून नवीन शैक्षणिक वर्ष २०२६- २७ प्रारंभ झाला. याचे औचित्य साधून महर्षि विवेकानंद समाजकल्याण संस्था अक्कलकोट संचलित अनंत चैतन्य माध्य.व उच्च माध्यमिक प्रशाला,हन्नूर येथे सर्व नवागतांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. शाळेत पहिल्यांदा येणाऱ्या, प्राथमिक शाळेतून माध्यमिक प्रशालेत प्रवेशित होणाऱ्या सर्व बालचमु व मोठ्या मुलां- मुलीमध्ये पहिल्या दिवशी एकच लगबग व उत्साह दिसून आला.नवीन बॅग, नवीन गणवेश, नवीन पाठ्यपुस्तके याविषयीची कुतूहल, उत्सुकता विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होती. सर्वप्रथम शाळेतील प्रवेशोत्सवाची सुरवात माजी प्राचार्य सिद्धेश्वर कल्याणशेट्टी यांच्या हस्ते प्रतिमापूजनाने करण्यात आली. यावेळी माजी उपसरपंच शरणप्पा हेगडे, माजी मुख्याध्यापक शिवप्पा साखरे, माजी शिक्षक सरदार मत्तेखाने व पालक वर्ग उपस्थित होते.
सर्व नवागतांचे व प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक विभागाच्या सौ.स्वप्नाली जमदाडे यांनी शब्द सुमनांनी स्वागत केले. यानंतर नावागतांचे औक्षण करून , बिस्किटे व गलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी सिद्धेश्वर कल्याणशेट्टी व शरणप्पा हेगडे यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्यात आली. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक ज्ञानदेव शिंदे, पर्यवेक्षक सुरेश जाधव, सांस्कृतिक विभाग प्रमुख अप्पासाहेब काळे, धनंजय जोजन, शशिकांत अंकलगे,
जेष्ठ शिक्षिका मृदुलादेवी स्वामी, सागर मठदेवरु, काशिनाथ पाटील, रविंद्र कालिबत्ते,सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहाजी माने यांनी केले तर सर्वांचे आभार मल्लम्मा चपळगाव यांनी मानले.
.png)
No comments:
Post a Comment