चित्रकार आणि लेखक ऋत्विज चव्हाण यांच्या कार्याचा राज्यस्तरीय गौरव
पुणे (कटूसत्य वृत्त):- आपल्या क्षेत्रात सातत्यपूर्ण आणि उल्लेखनीय योगदान देणारे ऋत्विज चव्हाण यांना नालंदा फाउंडेशन, महाराष्ट्र यांच्या वतीने प्रदान करण्यात येणारा राज्यस्तरीय सह्याद्री रत्न कला पुरस्कार २०२६ जाहीर झाला होता.
चित्रकला आणि साहित्य क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे. आपल्या कार्यातून समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचे कार्य त्यांनी केले असून त्यांच्या या योगदानाचा गौरव म्हणून हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
दिनांक १४ जून २०२६ रोजी श्रमिक पत्रकार भवन पुणे येथे आयोजित भव्य पुरस्कार सोहळ्यात हा सन्मान मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या निवडीबद्दल नालंदा फाउंडेशन, महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष डॉ. दीपक दादाराव जाधव यांनी चव्हाण यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
.png)
No comments:
Post a Comment