कन्हेरगाव ग्रामस्थांचे विजेच्या प्रश्नावर टेंभुर्णी येथे आमरण उपोषण;
शेकडो ग्रामस्थांचा सहभाग
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- कन्हेरगाव (ता. माढा) येथील वाड्या-वस्तीवरील सिंगल फेज वीजपुरवठा मागील दोन महिन्यांपासून रात्रीच्या वेळेत बंद ठेवण्यात येत असल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रश्नाच्या कायमस्वरूपी निराकरणासाठी कन्हेरगावचे माजी उपसरपंच धनंजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि. १५ जून) सकाळी १० वाजल्यापासून टेंभुर्णी येथील महावितरण कार्यालयासमोर शेकडो ग्रामस्थ, शेतकरी व युवकांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.
कन्हेरगांव ग्रामस्थांनी उपोषण सुरू केल्यानंतर महावितरणचे उपअभियंता महेश पवार तसेच पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल गणेश इंगोले , पोलीस नाईक आरकिले यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली. मात्र, वीजपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागून ठोस लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याची ठाम भूमिका आंदोलकांनी मांडली. यावेळी उपसरपंच लिंबाजी मोरे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन ग्रामस्थांना पाठिंबा दर्शविला.
या आंदोलनात ग्रामपंचायत सदस्य विजय माने, रमेश डोके, संजय डोके, पृथ्वीराज माने, राजेंद्र केदार, भारत शिंदे, नवनाथ शिंदे, सोसायटीचे माजी उपाध्यक्ष सुरेश पाटील, कांतीलाल शिंदे, माजी सरपंच जालींदर डोके पाटील , देविदास मोरे, माजी सरपंच दशरथ चव्हाण, माजी ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ कदम , संपत चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य सुधीर मोरे, सोसायटीचे संचालक महावीर मोरे, विशाल भरगंडे, संजय उर्फ दादासाहेब डोके पाटील, बाळासाहेब डोके पाटील, सौरभ डोके, शाळा समितीचे अध्यक्ष संजय पाटील, सिद्धेश्वर ताटे , ईश्वर शिंदे , विलास डोके, दत्तात्रय खोचरे , वैभव डोके, तानाजी पाटील, रोहन माने, नागनाथ पाटील, अशोक लांडगे, शांतीलाल मोरे, शिवाजी मोरे, विष्णू साखरे, चंद्रकांत डोके, अमोल डोके, चंद्रकांत मोरे, उमेश शिंदे, सुनील मोरे, शंकर केदार, सोमनाथ डोके, नाना नलवडे, मनोज चिंतामण, सोमनाथ भरगंडे, जालिंदर केदार, रणजीत साळुंके, रोहिदास सुर्वे, महेश डोके, औंदुबर खोचरे, स्वप्नील डोके, विकास मोरे, गजानन उर्फ बबलू डोके, अजय उर्फ बबलू केदार, बालाजी केदार, बालाजी डोके, रामलिंग केदार, किरण खोचरे, नामदेव डोके, संजय शिंदे, नामदेव मोरे, गणेश सरडे, अशोक पुजारी, रामचंद्र डोके, नागनाथ डोके, विशाल मोरे, शुभम माने, प्रवीण उर्फ सोनू डोके, शिवराज मोरे, दिलीप उर्फ भाऊ डोके , नागेश रतिलाल मोरे, सुरज शिंदे, सुनील चव्हाण, गणेश मोरे, विशाल केदार, महादेव मोरे, आकाश मोरे , पप्पू ढेरे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
गेल्या दोन महिन्यांपासून वाड्या-वस्तीवरील नागरिकांना रात्रीच्या वेळेत सिंगल फेज वीजपुरवठा खंडित होत असल्याने दैनंदिन जीवन, शेतीपूरक कामे, विद्यार्थ्यांचा अभ्यास तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेवर परिणाम होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या समस्येचे तातडीने निराकरण करून नियमित वीजपुरवठा सुरू करावा, अशी प्रमुख मागणी कन्हेरगांवचे माजी उपसरपंच धनंजय मोरे व आंदोलकांनी केली आहे.

No comments:
Post a Comment