नेताजी प्रशालेत नवागतांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, June 16, 2026

नेताजी प्रशालेत नवागतांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

 नेताजी प्रशालेत नवागतांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- निलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस प्रशालेत नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत, प्रवेशोत्सव व मोफत पाठ्यपुस्तक वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष अण्णाराव कुंभार होते. प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त प्राचार्य सुभाष धुमशेट्टी, विजयकुमार हुल्ले, मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी कुंभार, मुख्याध्यापक रविशंकर कुंभार, पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी नवागत विद्यार्थ्यांना दोन घोडे व दोन उंटावर बसवून ढोल-ताशांच्या गजरात आणि पुष्पवृष्टी करत प्रशालेत आणण्यात आले. या अनोख्या स्वागत सोहळ्यामुळे विद्यार्थी, पालक व उपस्थित नागरिकांमध्ये विशेष आकर्षण निर्माण झाले. त्यानंतर जयश्री बिराजदार व मीनाक्षी वांगीकर यांनी विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत केले. औक्षणानंतर विद्यार्थ्यांना पुष्प, खाऊ तसेच शासनाकडून प्राप्त झालेल्या मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.
यावेळी अण्णाराव कुंभार म्हणाले ,विद्यार्थ्यांना जिद्द, चिकाटी आणि सातत्य यांचे महत्त्व पटवून देत शिक्षणाच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्य घडविण्याचे आवाहन केले. समोरचा काळ आव्हानात्मक असला तरी शिक्षणाच्या प्रकाशातूनच यशाचा मार्ग खुला होतो असे ही ते म्हणाले. यावेळी मुख्याध्यापक रविशंकर कुंभार यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देत अभ्यास, शिस्त आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे महत्त्व सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वाराध्य मठपती यांनी केले तर शिवानंद पुजारी यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages