मोहोळ वनपरिक्षेत्र अंतर्गत वनक्षेत्रावरील अतिक्रमण हटवले - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, June 19, 2026

मोहोळ वनपरिक्षेत्र अंतर्गत वनक्षेत्रावरील अतिक्रमण हटवले

 मोहोळ वनपरिक्षेत्र अंतर्गत वनक्षेत्रावरील अतिक्रमण हटवले




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मोहोळ वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या अंतर्गत येत असलेल्या मौजे आळजापूर (ता. करमाळा) येथील राखीव वन क्षेत्रात वनविभागाने एक अत्यंत मोठी आणि धडक अतिक्रमण विरोधी कारवाई पार पाडली आहे. येथील राखीव वन गट क्रमांक १७६, १७७, १७८, १७९ व १८२ मधील सुमारे ७ हेक्टर (१७ पेक्षा जास्त एकर) शासकीय वन जमिनीवर करण्यात आलेले अनधिकृत अतिक्रमण वनविभागाने पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या संयुक्त मदतीने पूर्णपणे हटवून जमीन मोकळी केली आहे.
२० झोपड्या जमीनदोस्त; १९ जणांना अटक
मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, सदर राखीव वन क्षेत्रावर पारधी समाजातील काही व्यक्तींनी बेकायदेशीररित्या ताबा मिळवून त्या ठिकाणी २० झोपड्या उभारल्या होत्या. या संदर्भात वनविभागाने पूर्वतयारी करून अत्यंत गुप्ततेने व कडक पोलीस बंदोबस्तात ही मोहीम राबवली. कारवाई दरम्यान शासकीय वन जमिनीवर अतिक्रमण करून उभारण्यात आलेल्या सर्व २० झोपड्या पाडण्यात आल्या.
वन जमिनीवर बेकायदेशीररित्या अनधिकृत अतिक्रमण केल्याप्रकरणी घटनास्थळावरून १५ पुरुष आणि ४ महिला अशा एकूण १९ व्यक्तींना वनविभागाने ताब्यात घेऊन अटक केली. अटकेनंतर सर्व आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने गुन्याचे गांभीर्य विचारात घेऊन सर्व १९ आरोपींना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी वनरक्षक श्रीमती आयेशा पाशामियाँ शेख यांच्या फिर्यादीवरून मोहोळ वनपरिक्षेत्र कार्यालयात रॅ.गु.नं. ०५/२०२६ नुसार रीतसर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त फौजफाटा
सदरची धडक कारवाई पुणे विभागाचे मुख्य वनसंरक्षक आशिष ठाकरे व सोलापूरचे उपवनसंरक्षक कुलराज सिंह यांच्या थेट मार्गदर्शनाखाली व नियोजनानुसार पार पडली. प्रत्यक्ष घटनास्थळावर सहाय्यक वनसंरक्षक अजित शिंदे (EGS) व श्रीमती ऐश्वर्या शिंदे (CAMPA) यांनी मोहिमेचे नेतृत्व केले. वनपरिक्षेत्र अधिकारी (RFO): योगेश घोडके (मोहोळ), राजू आटोले (माळशिरस), रोहित गांगुर्डे (सोलापूर) आणि श्रीमती शीला बडे (बार्शी) यांच्यासह सोलापूर वनविभागातील सर्व वनपाल, वनरक्षक व वनमजूर असे मिळून ७५ ते ८० वन कर्मचारी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाचे २० पोलीस कर्मचारी या मोहिमेत तैनात होते.
पोलीस, महसूल आणि वनविभागाच्या या संयुक्त आणि कडक कारवाईमुळे सोलापूर जिल्ह्यातील शासकीय व राखीव वन जमिनींवर डोळा ठेवणाऱ्या भूमाफियांमध्ये आणि अतिक्रमण करणाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. आगामी काळातही राखीव वनांचे रक्षण करण्यासाठी अशाच प्रकारे तीव्र कारवाया केल्या जातील, असा स्पष्ट इशारा वनविभागाने दिला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages