आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा; विद्यार्थिनींनी सादर केली योगासने व प्राणायामाची प्रात्यक्षिके
करमाळा (कटूसत्य वृत्त):- आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पीएमश्री साधनाबाई नामदेवराव जगताप प्राथमिक मुलींची शाळा क्र. १, नगर परिषद करमाळा येथे उत्साहपूर्ण वातावरणात योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी योगा, क्रीडा व कला शिक्षक निलेश भुसारे यांनी विद्यार्थिनींना विविध योगासने, प्राणायाम तसेच योगाचे आरोग्यदायी फायदे याविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात शाळेतील सर्व विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध योगासने, प्राणायाम व ध्यान साधनेची प्रात्यक्षिके सादर केली. विद्यार्थिनींच्या सहभागामुळे संपूर्ण परिसरात सकारात्मक व आरोग्यदायी वातावरण निर्माण झाले.
यावेळी मुख्याध्यापक दयानंद चौधरी यांनी मनोगत व्यक्त करताना योगाचे महत्त्व अधोरेखित केले. योगामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते तसेच दैनंदिन जीवनात सकारात्मकता निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात शिक्षिका संध्या शिंदे, मोनिका चौधरी, सुनिता क्षिरसागर, सुवर्णा वेळापुरे, तृप्ती बेडकुते, योगिनी चवरे, प्रिया माहुले, चंद्रकला भुसारे तसेच शिक्षक रमेश नामदे व निलेश धर्माधिकारी यांनी विद्यार्थिनींसमवेत सामूहिक सूर्यनमस्कार, विविध योगासने व प्राणायामाची प्रात्यक्षिके सादर केली.
करमाळा नगर परिषदेच्या नगराध्यक्षा मोहिनीताई सावंत, उपनगराध्यक्ष तथा शालेय समिती सभापती अतुल फंड, नगरसेवक संजय सावंत, विक्रमसिंग परदेशी, साजेदा कुरेशी यांच्यासह सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी सचिन तपसे, प्रशासन अधिकारी जयवंत नलवडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा निर्मला फंड, उपाध्यक्षा आम्रपाली कांबळे व सर्व सदस्यांनी विद्यार्थिनी व शिक्षकांना योग दिनाच्या शुभेच्छा देत अभिनंदन केले.
योग दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये योगाविषयी जागरूकता निर्माण झाली असून विविध योगासने व प्राणायामाच्या प्रात्यक्षिकांसह आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात आणि प्रसन्न वातावरणात साजरा करण्यात आला.

No comments:
Post a Comment