योगमय झाला सिंहगड कॅम्पस; आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, June 23, 2026

योगमय झाला सिंहगड कॅम्पस; आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा

योगमय झाला सिंहगड कॅम्पस; आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- केगाव येथील सिंहगड पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावर्षीच्या "योगा फॉर हेल्दी एजिंग" या संकल्पनेनुसार निरोगी, संतुलित आणि आनंदी जीवनासाठी योगाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव तथा सिंहगड इन्स्टिट्यूट, केगावचे कॅम्पस डायरेक्टर संजय नवले उपस्थित होते. यावेळी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकांनी विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानसाधनेची प्रात्यक्षिके सादर केली. ताडासन, वृक्षासन, भुजंगासन, नौकासन, बालासन, अनुलोम-विलोम आणि कपालभाती यांसारख्या योगप्रकारांचे सादरीकरण करण्यात आले.

मार्गदर्शन करताना कॅम्पस डायरेक्टर संजय नवले म्हणाले, योग ही भारताची प्राचीन आणि अमूल्य परंपरा असल्याचे सांगत निरोगी शरीर, शांत मन आणि सकारात्मक जीवनशैलीसाठी नियमित योगाभ्यास आवश्यक असल्याचे नमूद केले. विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी योगाला दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवावे, असे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमादरम्यान योगामुळे शारीरिक लवचिकता, मानसिक एकाग्रता आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते, याविषयी माहिती देण्यात आली. नियमित योगाभ्यासामुळे आरोग्य संवर्धनास मोठी मदत होत असल्याचा संदेश उपस्थितांना देण्यात आला.

विशेष म्हणजे, कार्यक्रमात संजय नवले यांनी स्वतः शिक्षक व पालकांसमवेत विविध योगासने करून उपस्थितांना प्रेरणा दिली. या उपक्रमामुळे आरोग्याविषयी जनजागृती होण्यास मदत झाली असून सर्वांनी नियमित योगाभ्यास करण्याचा संकल्प केला.
कार्यक्रमाचे नियोजन आणि आयोजन कॅम्पस प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडले. योगाच्या माध्यमातून निरोगी जीवनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages