पायरीपूल-तांबवे येथे मुलींची वारकरी शिक्षण संस्थेचे उद्घाटन संपन्न
अकलूज (कटूसत्य वृत्त):- माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागातील अकलूज टेंभुर्णी रोडवरील पायरी पूल-तांबवे (ता.माळशिरस) येथील श्री क्षेत्र दत्तवाडी येथे अनुसया माता मुलींची वारकरी शिक्षण संस्था या नूतन शिक्षण संस्थेचे उद्घाटन माजी सहकार मंत्री व दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख व श्रीमती स्वयंप्रभादेवी मोहिते-पाटील यांचे हस्ते रविवारी दुपारी उत्साहात करण्यात आले.
अधिकमास पौर्णिमेच्या निमित्ताने श्री एकमुखी दत्त मंदिर पायरीपूल येथे रविवारी सकाळी एक दिवसीय कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.या किर्तन महोत्सवाचे औचित्य साधून या शिक्षण संस्थेचे व मुलींचे बालसंस्कार वर्ग प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ह.भ.प सागर महाराज बोराटे यांनी उपस्थित भक्तांना मार्गदर्शन केले. तसेच आमदार सुभाष देशमुख व श्रीमती स्वयंप्रभादेवी मोहिते-पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
कीर्तनाच्या कार्यक्रमानंतर मिटकलवाडीचे भीमराव रामचंद्र लोकरे यांनी महाप्रसाद अन्नदान सेवा केली.या कार्यक्रम स्थळी बापूसाहेब देहुकर महाराज यांनीही भेट दिली.त्याचप्रमाणे अनुसया माता मुलींची वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने सोमवार दि.१ जून ते शुक्रवार दि.१२ जून पर्यंत मुलींचे बालसंस्कार वर्ग प्रशिक्षण शिबिर व पाच दिवसीय कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
उद्घाटन कार्यक्रम व किर्तन महोत्सवाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंदिर समितीचे विश्वस्त अभिमन्यू साळुंखे,शिक्षण संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष पुनमताई साळुंखे,मंदिर समितीचे संचालक बापू तात्या मुंडफणे,मुरारजी इनामदार,महादेव चव्हाण,संभाजी घोंगाणे-जाधव, दत्तात्रय घोंगाणे-जाधव,दादासाहेब जाधव,दादासाहेब वाघ,सचिन माळी,अशोक गायकवाड,तुकाराम पाटोळे,तुकाराम जाधव,नवगिरे, सुमंत काका कुलकर्णी आदींनी परिश्रम घेतले.
बाल संस्कार वर्ग प्रशिक्षण शिबिरात मुलींनी सहभाग घ्यावा असे आवाहन अनुसया माता मुलींची वारकरी शिक्षण संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा ह.भ.प पूनम ताई साळुंखे यांनी केले आहे.
.png)
No comments:
Post a Comment