वादळी वाऱ्यासोबत अदानी सिमेंट कंपनीच्या धुळीचे साम्राज्य.....! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, June 9, 2026

वादळी वाऱ्यासोबत अदानी सिमेंट कंपनीच्या धुळीचे साम्राज्य.....!

 वादळी वाऱ्यासोबत अदानी सिमेंट कंपनीच्या धुळीचे साम्राज्य.....!




 दौंड (कटूसत्य वृत्त):- कानगाव परिसरामध्ये आदानी सिमेंट कंपनी व श्री सिमेंट कंपनी या दोन्ही कंपनीचे धुळीचे प्रदूषण होत आहे. त्याचबरोबर ओव्हरलोड वाहतुकीमुळे सुद्धा परिसरातील रस्ते खराब होत आहेत. वेळोवेळी निवेदन देऊनही संबंधित विभागाने अद्यापही या विषयाकडे दुर्लक्ष केले आहे. येणाऱ्या अधिवेशनामध्ये रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व विद्यमान आमदार सदाभाऊ खोत यांच्यामार्फत या दोन्ही सिमेंट कंपनीच्या प्रदूषणासंदर्भात व ओव्हरलोड वाहतुकी संदर्भात अधिवेशनामध्ये प्रश्न विचारला जाईल व जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत सिमेंट कंपनी विरोधात संघर्ष सुरूच राहील. संबंधित दोन्ही कंपनीच्या विरोधामध्ये आतापर्यंत प्रदूषण नियंत्रण मंडळ, परिवहन मंडळ, मुख्यमंत्री महोदय यांना निवेदन देण्यात आले असल्याचे राज्य प्रवक्ते भानुदास शिंदे रयत क्रांती संघटना दौंड यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages