पर्यावरण दिनानिमित्त सहकार महर्षी कारखान्याकडून वृक्षारोपण व ऊस शेती चर्चासत्र - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 8, 2026

पर्यावरण दिनानिमित्त सहकार महर्षी कारखान्याकडून वृक्षारोपण व ऊस शेती चर्चासत्र

 पर्यावरण दिनानिमित्त सहकार महर्षी कारखान्याकडून वृक्षारोपण व ऊस शेती चर्चासत्र



अकलूज (कटूसत्य वृत्त) : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखाना लि., शंकरनगर-अकलूज यांच्या वतीने शेती विभागीय कार्यालय, लवंग येथे वृक्षारोपण, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञान विषयक ऊस शेती चर्चासत्र तसेच सभासद स्मार्ट कार्ड वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम कारखान्याचे संचालक तथा नगरसेवक सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.

यावेळी कारखान्याचे मार्गदर्शक संचालक तथा माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील आणि चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची प्रगतीशील वाटचाल सुरू असल्याचे सांगण्यात आले.

कार्यक्रमात बोलताना सयाजीराजे मोहिते-पाटील यांनी पर्यावरण संवर्धनासाठी समाजात व्यापक जनजागृती होणे आवश्यक असल्याचे सांगितले. वृक्षलागवड ही काळाची गरज असून प्रत्येकाने पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा ऊस शेतीमध्ये प्रभावी वापर, आधुनिक शेती पद्धती आणि उत्पादनवाढ याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच सभासदांना स्मार्ट कार्डचे वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमास व्हाइस चेअरमन शंकरराव माने-देशमुख, डॉ. समाधान सुरवसे, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे येथील शास्त्रज्ञ डॉ. तुषार शितोळे, कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे डॉ. तुषार पोळ, सभासद, शेतकरी तसेच कारखान्याचे कार्यकारी संचालक सुहास यादव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages