(कटूसत्य वृत्त):- नागेश म्हेत्रे मित्र परिवाराच्या वतीने राज्यसभेचे नुतन खासदार प्रा. डॉ. सौ. ज्योतीताई वाघमारे व मोची समाजातील नुतन नगरसेवक, नुतन पदाधिकारी व १० वी, १२ वी तील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात अखिल भारतीय नाट्य परिषदेचा पद्माकर देव सभागृहात माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांच्या शुभहस्ते व जेष्ठ नेते सुधीरजी खरटमल यांच्या अध्यक्षते खाली व माजी महापौर संजय हेमगड्डी, माजी स्थायी समिती सभापती देवेंद्र भंडारे, नागेश (अण्णा) म्हेत्रे, अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष मुश्ताक बेन्नीशिरुर, शहर अध्यक्ष अॅड. राजु जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
मोची समाजातील नुतन खासदार प्रा. डॉ. सौ. ज्योतीताई वाघमारे यांच्यासह नुतन नगरसेवक प्रा. नरसिंह असादे, स्विकृत नगरसेवक ऋषिकेश मेट्रे, रेल्वे सल्लागार बोर्डाचे नुतन सदस्य दिनेश म्हेत्रे, नुतन मोची समाज जिल्हाध्यक्ष सैदप्पा जंगडेकर, जनरल सेक्रेटरी जगन्नाथ सज्जन, कार्याध्यक्ष बाबा करगुळे, सोशल बँकेचे संचालक राजेंद्र कोरे, सो.म.पा. चे वैद्यकीय अधिकारी योगेश पल्लेलु, सेवानिवृत्त कर्मचारी रमेश फुले, आमआदमी पार्टीचे नुतन शहर अध्यक्ष निलेश संगेपाग इत्यादींचा सत्कार करण्यात आला. सत्काराप्रसंगी नुतन खासदार प्रा. डॉ. सौ. ज्योतीताई वाघमारे यांनी मिळालेल्या संधीचा उपयोग सर्व सामान्य दिन-दलित, गोर-गरीब जनतेच्या विकासासाठी व समाजातील विद्यार्थी व युवकांसाठी शैक्षणिक व रोजगार विषयक उपक्रम राबवुन समाजामध्ये प्रबोधन करण्याचा संकल्प व्यक्त केला. व सत्काराबद्दल नागेश म्हेत्रे मित्र परिवाराचे व एन. एम. फाऊंडेशनचे आभार मानले.
या प्रसंगी सर्व मान्यवरांनी गुणीजनांचा व नुतन खासदारांचा गुणगौरव करुन नागेश म्हेत्रे मित्र परिवार
व एन.एम. फाऊंडेशनाच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांची प्रशंसा केली.
या प्रसंगी १० वी, १२ वी नंतर पुढे काय? या विषयावर ड्रिम फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा.
काशिनाथ भतगुणकी यांचे पालक व विद्यार्थ्यांसाठी अभ्यासपूर्ण व मौलिक मार्गदर्शन झाले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मुख्य निमंत्रक शैलेंद्र मोरे यांनी केले व प्रस्तावीक विश्वेंद्र मोरे यांनी केले.
तर अभार जॉर्ज बंडेल्लु यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रविकांत मस्के, एजाज शेख, डॉ. किरण खरात, वामसी म्हेत्रे, अभिषेक म्हेत्रे, गोविंद हेमरेड्डी, अक्षय फुले इत्यादींनी परिश्रम घेतले.


No comments:
Post a Comment