योग ही भारताची जगाला अमूल्य देणगी- महापौर कोंड्याल - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, June 23, 2026

योग ही भारताची जगाला अमूल्य देणगी- महापौर कोंड्याल

 योग ही भारताची जगाला अमूल्य देणगी- महापौर कोंड्याल




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी असल्याचे सांगितले. धावपळीच्या जीवनात निरोगी आरोग्यासाठी योग अत्यंत आवश्यक असून प्रत्येक नागरिकाने दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करावा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे योगाला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली असून आज जगभरात मोठ्या उत्साहात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात असल्याचे प्रतिपादन महापौर विनायक कोंड्याल यांनी केले.
            जागतिक योग दिनानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या मध्य पूर्व मंडलच्या वतीने कर्णिक नगर येथील जिजामाता उद्यानात शनिवारी विशेष योग साधना कार्यक्रम उत्साहात पार पडला. नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे परिसर योगमय वातावरणाने भारावून गेला.कार्यक्रमास सोलापूर महानगरपालिकेचे महापौर विनायक कोंड्याल यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नगरसेवक अक्षय अंजीखाने, विजय चिप्पा, सिद्धेश्वर कमटम, बापू वाडेकर, मेघनात येमुल यांच्यासह नगरसेविका, भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
          कार्यक्रमाची सुरुवात सामूहिक योग साधनेने झाली. यावेळी विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानधारणा यांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. योगामुळे शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. तसेच दैनंदिन जीवनातील ताणतणाव कमी करून सकारात्मक जीवनशैली अंगीकारण्यास योग उपयुक्त ठरतो, अशी माहिती उपस्थितांना देण्यात आली.यावेळी ८८ वर्षीय ज्येष्ठ योगाचार्य विठ्ठल जाधव यांनी योगाचे महत्त्व विशद करत नियमित योगाभ्यासामुळे शरीर निरोगी राहते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि जीवनशैली अधिक सुदृढ बनते.शरीरातील अनेक आजारांपासून दूर राहण्यासाठी आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी प्रत्येकाने दररोज योग केला पाहिजे," असे आवाहन त्यांनी केले. यावेळी कार्यकर्ते आणि कर्णिक नगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages