शेतकरी कुटुंबातील स्नेहलची सीए परीक्षेत यशस्वी भरारी
अकलूज (कटूसत्य वृत्त):- दहिगाव ता.माळशिरस येथील शेतकरी कुटुंबातील कन्या कु. स्नेहल राजश्री हनुमंत किर्दक हिनेचार्टर्ड अकाउंटंट (सीए) परीक्षा उत्तीर्ण करून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. ग्रामीण भागातून अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या सीए परीक्षेत यश मिळवून तिने आपल्या कुटुंबासह परिसराचे नाव उज्ज्वल केले आहे.
स्नेहल हिचे प्राथमिक शिक्षण शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज संचलित श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते प्राथमिक शाळा, नातेपुते येथे झाले. त्यानंतर मोरजाई विद्यालय, मोरोची येथे माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. तुळजाराम चतुरचंद विद्यालय, बारामती येथे वाणिज्य शाखेत उच्च माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर भारती विद्यापीठ, पुणे येथून बी.कॉम. पदवी प्राप्त केली.
त्यानंतर फाउंडेशन, इंटरमिजिएट आणि तीन वर्षांची एंट्रन्सशिप यशस्वीपणे पूर्ण करत पुणे येथे सीए फायनल परीक्षा उत्तीर्ण होऊन तिने चार्टर्ड अकाउंटंट होण्याचा मान मिळविला.
स्नेहल हिचे आजोबा लालासो पांडुरंग किर्दक हे शेतकरी असून आजी प्रभावती यांचे तिला प्रेरणादायी मार्गदर्शन लाभले. वडील हनुमंत किर्दक हे शिक्षक व शेतकरी असून आई राजश्री किर्दक या शेतीकाम करतात.काका सोमनाथ आणि काकी रेखा सहकुटुंबाच्या पाठिंब्यामुळे आणि स्वतःच्या अथक परिश्रमामुळे तिने हे यश संपादन केले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आणि विशेषतः मुलींसाठी स्नेहलचे यश प्रेरणादायी ठरत असून, जिद्द आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठता येते, हे तिने सिद्ध करून दाखवले आहे.
स्नेहल किर्दक हिच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.
.png)
No comments:
Post a Comment