अनगर प्रशालेत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, June 23, 2026

अनगर प्रशालेत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

 अनगर प्रशालेत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा




अनगर (कटूसत्य वृत्त):- कै. शंकरराव बाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, अनगर येथे दि. २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना योगासने व प्राणायाम यांचे महत्त्व समजावे तसेच त्यांचा दैनंदिन जीवनात उपयोग व्हावा या उद्देशाने विशेष योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी योगगुरू बंडगर गुरुजी यांनी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना विविध योगासने, प्राणायाम आणि त्यांचे आरोग्यदायी फायदे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी विविध योगासनांची प्रात्यक्षिके सादर करून शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक स्वास्थ्य आणि एकाग्रता वाढविण्यात योगाचे महत्त्व स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने योगासनांमध्ये सहभाग घेतला. बंडगर गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या योग शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये योगाविषयी जागरूकता निर्माण झाली.
यावेळी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत ढोले, प्राचार्य महादेव चोपडे, उपप्राचार्य माधव खरात, पर्यवेक्षक राजेंद्र डोके, तसेच रवींद्र बोडके, दाजी गुंड, विलास गुंड, अर्चना गुंड, हरी शिंदे, चंद्रकांत सरक यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान बाबुराव पाटील महाविद्यालयाचे ग्रंथपाल महादेव चव्हाण यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची पीएचडी पदवी प्राप्त झाल्याबद्दल विशेष सन्मानित करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक व संशोधन कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages