व्हिएतनाम दौरा सोलापूरच्या गारमेंट उद्योगाच्या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनची सुरुवात असेल- श्रीकांत अंबुरे
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- व्हीएतनाम दौरा हा फक्त फॅक्टरी विजिट नव्हता तर सोलापूरच्या गारमेंट उद्योजकाच्या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन ची ती सुरुवात होती. आणि स्मार्ट लिंक एआय च्या लॉन्च पर्यंत हा कार्यक्रम पार पडला. यामुळे सोलापूर आता जागतिक नकाशावर येण्यासाठी सज्ज झाले असल्याचे मत सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे खजिनदार श्रीकांत अंबुरे यांनी व्यक्त केले.
जॅक या कंपनीने नव्याने विकसित केलेले स्मार्ट लिंक ए.आय. तंत्रज्ञानाचे सादरीकरण म्हणजे संपूर्ण गारमेंट उत्पादन क्षेत्र पूर्णपणे बदलून टाकणारे आहे. कारण ए आय मुळे उत्पादकता 40 ते 50 टक्क्यापर्यंत वाढण्याची शक्यता यावेळी व्यक्त करण्यात आली. तसेच क्वालिटी कंट्रोल मध्ये रियल टाईम मध्ये म्हणजे अगदी वेळेवर दोष ओळखून या मध्ये वाया जाणारे कापड वाचवता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महत्त्वाचे म्हणजे सोलापूरच्या गरजेनुसार खास डिझाईन केलेल्या दोन अत्याधुनिक मशीन्स या वेळी लॉन्च करण्यात आल्या. त्यामुळे सोलापूरचा गारमेंट उद्योग उत्पादकता मध्ये नेक्स्ट लेवल गाठू शकेल. ए आय मुळे उत्पादकता क्वालिटी कंट्रोल तसेच ऑटोमेशन चेंज सिस्टीम पेक्षा पुढची पायरी असलेले मशीन स्वतःच सेटिंग बदलून घेऊन उत्पादन वाढविण्यासाठी मदत करेल. यामुळे वेळेची बचत होईल आणि उत्पादने वाढलेले असेल.
या या शिष्ट मंडळाने जॅक कंपनीचे विशेष आभार मानले . आणि लिओ यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. त्यांनी आम्हाला जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानाची ओळख करून दिली. या व्हिएतनाम दौऱ्यात सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे अध्यक्ष सतीश पवार आणि संपूर्ण शिष्टमंडळ त्यांचे मनापासून आभार मानले. तसेच उद्योग आधुनिकीकरण उपक्रमाला संपूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन देखील देण्यात दिले.
या वेतनाम दौऱ्याचे फलित सांगत असताना सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे अध्यक्ष सतीश पवार म्हणाले की या परिषदेत मोरोक्को, श्रीलंका, रशिया, उझबेकिस्तान, चीन, व्हिएतनाम येथील आघाडीच्या उत्पादकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. जागतिक ट्रेंड्स आणि बेस्ट प्रॅक्टिसेस समजून घेता आल्या. त्यामुळे त्यांचे मनापासून आभार अशी मनापासून अशी कृतज्ञता या शिष्टमंडळाने व्यक्त केले.
जागतिक स्पर्धेत युनिफॉर्म उत्पादन त्याचे गुणवत्ता उत्पादन क्षमता या स्पर्धात्मक युगात ए आय स्मार्ट लिंक तंत्रज्ञानाची माहिती अशा विविध उद्देशाने 13 जून ते 17 जून या कालावधीत व्हिएतनाम दौरा शिवण यंत्र उत्पादक कंपन्यांमध्ये अग्रगण्य असलेल्या जॅक या शिलाई मशीन कंपनीने हा दौरा गणेश सुत्रावे यांच्या माध्यमातून आयोजित केले होते तो यशस्वीपणे पूर्ण झाला.
या यशस्वी व्हिएतनाम दौऱ्यामध्ये सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे अध्यक्ष सतीश पवार, उपाध्यक्ष रमेश डाकलिया, खजिनदार श्रीकांत अंबुरे, डायरेक्टर आनंद झाड, सदस्य प्रशांत राठी तसेच सीएमएआय वेस्टर्न रिजनचे डायरेक्टर अमित कुमार जैन, असोसिएटेड गारमेंट क्लस्टर फाउंडेशन चे डायरेक्टर अजय रंगरेज यांचा समावेश होता.
.png)
.png)
No comments:
Post a Comment